नटराजन आणि शार्दूल ठाकूर नंतर मोहोम्मद सिराजला मिळाले आनंद महिंद्रांचे खास गिफ्ट

दैनिक गोमंतक
रविवार, 4 एप्रिल 2021

ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकल्यानंतर सहा खेळाडूंना गिफ्ट देण्याचे वचन आनंद महिंद्रा यांनी दिले होते.

प्रसिद्ध महिंद्रा कंपनीचे मालक आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजला थार-एसयूव्ही ही कार भेट देऊन आपले वचन पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकल्यानंतर सहा खेळाडूंना 'महिंद्रा थार'  गिफ्ट देण्याचे वचन आनंद महिंद्रा यांनी दिले होते. महिंद्रा यांनी दिलेल्या या गिफ्टची माहिती मोहोम्मद सिराज याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. (Mohommad Siraj got Mahindra Thar from Anand Mahindra)

महिंद्रा यांनी दिलेल्या या गिफ्ट मुळे आनंदित झालेल्या मोहोम्मद सिराज याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि या बद्दलची माहिती दिली. यावेळी सिराजने सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले की,"माझ्याकडे हा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, सुंदर महिंद्रा कार पाहून मला खूप आनंद झाला असून, मी आनंद महिंद्रा यांचा आभारी आहे. मात्र दुर्दैवाने मी हे गिफ्ट स्वीकारण्यासाठी हजर राहू न शकल्याने माझी आई आणि मोठा भाऊ यांनी हे गिफ्ट स्वीकारले."

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी यापूर्वी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि टी नटराजन यांनाही अशीच महिंद्रा थार ही कार भेट दिली आहे. या दोघांनीही या गिफ्ट साठी  उद्योजक आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहे. टी नटराजनला सर्वात आधी हे गिफ्ट देण्यात आले होते, त्यावेळी टी नटराजनने याबद्दलची माहिती देताना सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट मध्ये लिहिले होते की,"भारतासाठी क्रिकेट खेळणे ही आपल्यासाठी अत्यंत मोठी बाब असून, इथपर्यंत पोहोचणे माझ्यासाठी सोपे नव्हते. ज्या पद्धतीने लोकांचे प्रेम मिळते आहे ते पाहून आपण भावून गेलो आहोत."  

संबंधित बातम्या