क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस पैसा वसूल; चार संघ आमने-सामने

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

क्रीडा प्रेमींसाठी असे क्वचितच घडते जेव्हा दिवसभर खेळाचा थरार सुरू राहतो. त्याचबरोबर आयपीएल प्रेमींसाठी आजचा दिवस पैसे वसूल असणार  आहे.

IPL 2021: क्रीडा प्रेमींसाठी असे क्वचितच घडते जेव्हा दिवसभर खेळाचा थरार सुरू राहतो. त्याचबरोबर आयपीएल प्रेमींसाठी आजचा दिवस पैसे वसूल असणार  आहे. आज आयपीएलमध्ये एक नाही तर दोन सामने आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14 व्या सत्रातील आजचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. त्याचबरोबर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. हे चार संघ रविवारी मुंबई येथील वानखेडे स्टेडियम आणि चेन्नई येथील चिदंबरम स्टेडियम येथे भिडणार आहेत. ( money recovery for cricket fans Four teams face to face)

IPL 2021: रोहित शर्माने रचला विक्रम ; धोनीलाही टाकले मागे

कोलकत्ता विरुद्ध बेंगलोर 
कोलकाता नाइट रायडर्स त्यांच्या मधल्या फळीतील कमकुवतपणा दूर करेल आणि आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध त्यांची गाडी ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करेल.  दोन सर्वोत्कृष्ट कर्णधार इयॉन  मॉर्गन आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वात संघ खेळणार आहेत.  सामन्यात आरसीबीच्या संघाचा आत्मविश्वास थोडासा जास्त दिसेल कारण त्यांनी मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. कुशल व्यवस्थापयासाठी परिचित असलेला  इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन केकेआरची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करेल.

संभाव्य संघ बेंगलोर 
देवदत्त पडीक्कल, विराट कोहली(कप्तान), शाहबाज अहमद, एबी डिव्हिलियर्स (विकेटकिपर), ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिश्चन, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
संभाव्य संघ कोलकाता 
शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयन मॉर्गन (कप्तान), साकिब अल हसन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंग, प्रसिध्दा कृष्णा.

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार

दिल्लीच पडेल पंजाबवर भारी 
आज दिल्ली कॅपिटल आणि पंजाब किंग्ज यांच्यात  आयपीएलमधील  मुख्य सामना होणार आहे. रिषभ पंतच्या कर्णधारपदाच्या कौशल्याचीही चाचणी आजच्या सामन्यात होणार आहे. मागील सामना गमावल्यानंतर दोन्ही संघ या सामन्यात दाखल होतील, पण दिल्लीचा राजधानी कागदावर एक मजबूत संघ असल्याचे दिसत आहे आणि अशा परिस्थितीत दिल्लीचे पारडे जड वाटते.

संभाव्य संघ दिल्ली  
शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (कॅप्टन/विकेटकिपर), मार्कस स्टोईनिस, ललित यादव, ख्रिस वॉक्स, रवि अश्विन, कागिसो रबाडा, टॉम करण/ एनरिच नॉर्टजे, अवेश खान
संभाव्य संघ पंजाब
केएल राहुल (कप्तान/विकेटकिपर), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हूडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, झ्ये रिचर्डसन, रिले मेरिडिथ, मुरुगन अश्विन / रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह 
 

संबंधित बातम्या