शाब्दिक बाचाबाचीवरुन मॉरिस आणि हार्दिकला तंबी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर सामन्यात ख्रिस मॉरिस आणि हार्दिक पंड्या यांच्यात शाब्दिक वाद झाला. याची दखल सामनाधिकाऱ्यांनी घेतली असून दोघांनाही तंबी दिली आहे.

दुबई  : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर सामन्यात ख्रिस मॉरिस आणि हार्दिक पंड्या यांच्यात शाब्दिक वाद झाला. याची दखल सामनाधिकाऱ्यांनी घेतली असून दोघांनाही तंबी दिली आहे.

मुंबईच्या डावाच्या १९ व्या षटकात ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर हार्दिक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला, त्या वेळी मॉरिसने हार्दिकला उद्देशून शेरेबाजी केली. 
या वादामुळे हार्दिक बराच चिडला होता आणि त्याने मॉरिसला हाताने इशाराही केला. सर्व प्रकार पाहता सामन्याचे पंच मनू नायर यांनी दोघांनाही आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले.

ख्रिस मॉरिसला आचारसंहितेच्या २.५ आणि हार्दिक पंड्याला आचारसंहितेच्या २.२० नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. याव्यतिरिक्त दोन्ही खेळाडूंना अशा प्रकारे पुन्हा न वागण्याची सूचनासुद्धा देण्यात आली आहे

संबंधित बातम्या