पूजा व पावसाचा गोव्याला तडाखा

महिला क्रिकेट स्पर्धेत मध्य प्रदेशचा ४५ धावांनी विजय
MP Women's Cricketer Pooja Vastrakar
MP Women's Cricketer Pooja VastrakarDainik Gomantak

Goa: मध्य प्रदेशची (MP) कर्णधार पूजा वस्त्रकार (Pooja Vastrakar) हिने आक्रमक फलंदाजीने तडाखा दिल्यानंतर, गोव्याला (Goa) नंतर पावसाच्या अडथळ्यास सामोरे जावे लागले, त्यामुळे सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत व्हीजेडी पद्धतीनुसार 45 धावांनी हार पत्करावी लागली.

MP Women's Cricketer Pooja Vastrakar
माजी निवडकर्ते सरनदीप सिंग यांचे रोहितच्या कर्णधारपदावर 'मोठे' विधान

एलिट ड गट सामना बुधवारी विशाखापट्टणम येथील कांडुकुरी क्रिकेट अकादमी मैदानावर झाला. मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि कर्णधाराने स्वतः शानदार फलंदाजी करून निर्णय सार्थ ठरविला. भारताच्या कसोटी अष्टपैलूने 99 चेंडूंत आठ चौकार व एका षटकाराच्या मदतीने 84 धावा केल्या. त्यामुळे मध्य प्रदेशने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 209 धावा केल्या. 33 षटकांत गोव्याची स्थिती 4 बाद 90 अशी असताना पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर व्हीजेडी पद्धतीने सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला.

MP Women's Cricketer Pooja Vastrakar
क्रिकेटमधील अप्सरेला पाहून तुम्हीही व्हाल क्लिन बोल्ड!

गोव्याला पूर्वजा वेर्लेकर (26) व श्रेया परब (22) यांनी 15.2 षटकांत 45 धावांची सलामी दिली, मात्र नंतर 18 धावांत 4 विकेट गमावल्यामुळे गोव्याची 4 बाद 63 अशी घसरगुंडी उडाली, तसेच धावगतीवरही परिणाम झाला. सुनंदा येत्रेकर (नाबाद 15) व संजुला नाईक (नाबाद 10) या दोघी खिंड लढवत असताना पावसामुळे सामना थांबवावा लागला.

मध्य प्रदेशचा सलग तिसरा विजय

एलिट ड गटात मध्य प्रदेशने सलग तिसरा सामना जिंकला. त्यामुळे त्यांचे सर्वाधिक 12 गुण झाले आहेत. गोव्याला पहिलाच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 8 गुण व दुसरा क्रमांक कायम आहे. विदर्भ व गुजरातचे प्रत्येकी 6, हरियानाचे 4 गुण आहेत. मिझोरामला अजून गुणखाते खोलता आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com