टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार आता 'एमपीएल स्पोर्ट्स'चं नाव..

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

मागील करारात नाईकेकडून जवळपास ३५० कोटी रूपयांची स्पॉन्सरशिप रक्कम मिळाली होती. यात ८८ लाख रूपये प्रति सामना तसेच वार्षिक रकमेचाही समावेश होता.   

नवी दिल्ली- 'बीसीसीआय'ने या आठवड्यात किट स्पॉन्सरशिपसाठी एमपीएल स्पोर्ट्ससोबत तीन वर्षांचा करार केला आहे. या कराराची रक्कम मात्र बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मागील करारात नाईकेकडून जवळपास ३५० कोटी रूपयांची स्पॉन्सरशिप रक्कम मिळाली होती. यात ८८ लाख रूपये प्रति सामना तसेच वार्षिक रकमेचाही समावेश होता.   

नवीन करारानुसार बीसीसीआयला 57 लाख रूपये प्रति सामना इतकी रक्कम मिळणार असल्याची चर्चा आहे. तसेच मर्चेंटाईजद्वारे होणाऱ्या विक्रीच्या 10 टक्के रक्कमही बीसीसीआयला मिळणार आहे. या कराराची एकूण किंमत 120 कोटी रूपये असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात केली जात आहे. 

साहजिकच ही मागील कराराहून लहान रक्कम आहे. मात्र, ही रक्क्म मागीलवेळेपेक्षा मोठी असल्याचा दावाही केला जात आहे. यात बीसीसीआयला जास्त पैसे मिळणार आहेत. करार नेमका कसाही झाला तरी बीसीसीआयला यातून बराच फायदा होणार हे नक्की आहे. मात्र, नवीन स्पॉन्सर एमपीएललाही स्पोर्ट्सलाही या नवीन करारातून चांगलाच लाभ होईल.   
 

संबंधित बातम्या