'दुखापतीशिवाय खेळतो हे एक सुदैवच'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

नाणेफेकीच्या वेळी समालोचकांनी माझ्या दोनशेव्या आयपीएल लढतीचा उल्लेख केला त्यामुळेच मला हे समजले. याचे समाधान आहे, पण अजून एक सामना खेळत आहे, याव्यतिरिक्त यास जास्त महत्त्व नाही.

दुबई- आयपीएलमध्ये माझ्या दोनशे लढती पूर्ण झाल्या हे माझ्यासाठीच नवीन आहे. दीर्घ काळ दुखापतीविना खेळलो हे सुदैवच आहे, असे महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

धोनी सोमवारी (ता. १९) राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल लढत खेळत आहे. ही त्याची आयपीएलमधील २०० वी लढत आहे. हा टप्पा गाठलेला तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

नाणेफेकीच्या वेळी समालोचकांनी माझ्या दोनशेव्या आयपीएल लढतीचा उल्लेख केला त्यामुळेच मला हे समजले. याचे समाधान आहे, पण अजून एक सामना खेळत आहे, याव्यतिरिक्त यास जास्त महत्त्व नाही. दुखापतींविना एवढा दीर्घ खेळत आहे, हे एक प्रकारे सुदैवच म्हणायला हवे, असे धोनीने सांगितले.

संबंधित बातम्या