पुढच्या आयपीएलमध्येही 'थाला' खेळणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

चेन्नई संघाच्या पिवळ्या जर्सीतील ही शेवटची लढत आहे का, या प्रश्‍नास धोनीने नक्कीच नाही, असे स्पष्ट उत्तर दिले. मात्र त्याबद्दल जास्त बोलणे टाळले.

अबु धाबी-  आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतलेला महेंद्रसिंग धोनीने आपल्या आयपीएल निवृत्तीच्या बातम्यांना अखेर पूर्णविराम दिला. त्याने आपण स्पर्धेतील अखेरचा सामना खेळला नसल्याचे सांगितले. 

चेन्नई संघाच्या पिवळ्या जर्सीतील ही शेवटची लढत आहे का, या प्रश्‍नास धोनीने नक्कीच नाही, असे स्पष्ट उत्तर दिले. मात्र त्याबद्दल जास्त बोलणे टाळले.

चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्‍वनाथन यांनीही धोनी २०२१ च्या आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले. ‘‘धोनी नक्कीच २०२१ च्या मोसमात चेन्नईचे नेतृत्व करेल याचा आम्हाला विश्‍वास आहे. त्याने आम्हाला तीन स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. प्रथमच आम्ही प्ले ऑफला पात्र ठरलो नाही,’ असे ते म्हणाले. 

धोनीची जागा घेणे खूप आव्हानात्मक आहे. त्याने आपली खास जागा निर्माण केली आहे. तो यष्टीरक्षक, फलंदाजच नव्हे तर कर्णधार म्हणूनही यशस्वी आहे. त्याच्या जागी कोणाला शोधणे म्हणजे कपिलदेव, सचिन तेंडुलकरचा पर्याय शोधण्यासारखे आहे. - रवी शास्त्री

संबंधित बातम्या