Team India: रिक्षाचालकाच्या मुलाची टीम इंडियात एन्ट्री! पाहा कशी आहे आजपर्यंतची कामगिरी

भारतीय संघात निवड झालेल्या मुकेश कुमारची कशी कामगिरी राहिलीये, याबद्दल जाणून घ्या.
Mukesh Kumar
Mukesh Kumar Dainik Gomantak

Mukesh Kumar: भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. 3 तारखेपासून सुरू होणाऱ्या या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यातील टी20 संघात बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचाही समावेश करण्यात आला आहे.

त्याच्या निवडीनंतर नक्की तो कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, मुकेशने आत्तापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून निवड समीतीचे लक्ष वेधले आहे.

Mukesh Kumar
IND vs SL: टीम इंडियात बदलाचे वारे! निवड समितीच्या 'या' 5 निर्णयांनी दिला धक्का

मुकेशचा जन्म बिहारमधील गोपाळगंज येथे झाला होता. पण तो देशांतर्गत क्रिकेट बंगाल संघासाठी खेळतो. त्याचे वडील कोलकात्यामध्ये रिक्षा चालवायचे. त्यातून ते त्यांच्या कुटुंबाला सांभाळत होते.

कोलकात्यात असताना मुकेशही क्रिकेटमध्ये रमला. मुकेशची आर्मीमध्ये जाण्याचीही इच्छा होती, पण त्याला त्यात अपयश आले. अखेर त्याने क्रिकेटमध्येच त्याची कारकिर्द घडवली.

भारतीय अ संघाकडूनही शानदार कामगिरी

काही दिवसांपूर्वीच भारतीय अ संघाने बांगलादेश दौरा केला होता. या दौऱ्यात खेळताना त्याने दोन चारदिवसीय सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो सर्वांच्याच नजरेत आलेला.

आयपीएलमध्येही कोट्यावधींची बोली

मुकेशला आयपीएल 2023 लिलावातही मोठी बोली लागली आहे. त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने 5 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केले आहे. त्यामुळे तो आता आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसेल.

Mukesh Kumar
IND vs SL: 'रेस्ट दिलीये की ड्रॉप केलंय?', टीम इंडियाची घोषणा होताच भन्नाट मीम्स व्हायरल

आत्तापर्यंतची कामगिरी

मुकेशने आत्तापर्यंत 33 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 123 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 24 सामने खेळले असून 26 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 23 टी20 सामने खेळले असून 25 विकेट्स घेतल्या आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार, शिवम मावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com