धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने चाहत्यांना पुन्हा रडवले

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

या दोघांमधील दुसऱ्या लढतीत मुंबईने दहा विकेटने विजय मिळवत अव्वल स्थान मिळवले तर चेन्नईचे आव्हान तीन सामने शिल्लक असण्यापूर्वीच संपुष्टात आल्यातच जमा झाले. 
चार विकेट मिळवणाऱ्या टेंड्र बोल्डने चेन्नईच्या फलंदाजीचे नटबोल्ड ढिले केले, त्यामुळे चेन्नईचा डाव ११४ धावांत संपुष्टात आला.

शारजा- जळपास महिन्यापूर्वी आयपीएलच्या सलामीला चेन्नईने गतविजेत्या मुंबईचा पराभव करून शानदार सुरुवात केली होती. आजचे चित्र एकदम बदलले होते. या दोघांमधील दुसऱ्या लढतीत मुंबईने दहा विकेटने विजय मिळवत अव्वल स्थान मिळवले तर चेन्नईचे आव्हान तीन सामने शिल्लक असण्यापूर्वीच संपुष्टात आल्यातच जमा झाले. 
चार विकेट मिळवणाऱ्या टेंड्र बोल्डने चेन्नईच्या फलंदाजीचे नटबोल्ड ढिले केले, त्यामुळे चेन्नईचा डाव ११४ धावांत संपुष्टात आला. विजयाचे हे माफक आव्हान मुंबईने १२.२ षटकांत पार केले. रोहित शर्मा मांडीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही, त्याच्याऐवजी सलामीला येणाऱ्या ईशान किशानने चेन्नईच्या गोलदाजांची बेदम धुलाई केली. त्याने ३७ चेंडूत नाबाद ६८ धावा करताना डिकॉकसह ११६ धावांची नाबाद सलामी दिली. त्या अगोदर मुंबईचे गोलंदाज बोल्टने चार तर बुमराने दोन विकेट मिळवले होते.

चेन्नईची दाणादाण

चेन्नईने अखेरच्या पाच षटकांत ४३ धावा केल्या आणि त्याही डावातील नवव्या जोडीने. नवव्या विकेटसाठी आयपीएलमधील सर्वोत्तम भागीदारी झाली खरी, पण त्यापूर्वी चेन्नईची अवस्था काय झाली असेल हे लक्षात येते. त्यानंतरही ही अवस्था ४ बाद ३, ५ बाद २१, सातव्या षटकात धोनी बाद झाल्याने ६ बाद ३० अशी कोणालाही अपेक्षित नव्हती. तळाच्या फलंदाजांनी खरं तर सॅम करेनने कडवा प्रतिकार केल्यामुळेच चेन्नईला शतकी पल्ला गाठता आला होता.  खरं तर शारजाची खेळपट्टी काही अचानक गोलंदाजांच्या आहारी गेली नव्हती, पण चेन्नईचा आत्मविश्‍वासच खच्ची झाला होता. नवोदितांची आव्हान देण्याची तयारी नव्हती. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराच्या अचूक भेदक गोलंदाजीने चेन्नईच्या आघाडीचे फलंदाजांसमोरील पेपर जास्तच अवघड केला आणि तो त्यांना सुटला नाही. ऋतुराज गायकवाड (०), फाफ डू प्लेसिस (१), अंबाती रायूदू (२) आणि नारायण जगदीसन (०) हे पहिले चार फलंदाज २.५ षटकात ३ धावात परतले होते. पाच षटकेही होण्यापूर्वीच धोनीने फलंदाजीस आला होता, पण बोल्टने जडेजाला बाद केल्यावर धोनीही फार टीकला नाही. करनने संघाची लाज काही प्रमाणात राखल्याचे समाधान त्यांना लाभले. 
 

संबंधित बातम्या