इंडियन सुपर लीग: मुंबई सिटीकडून जाहूच्या करारावर शिक्कामोर्तब

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

मुंबईतील संघाने या ३२ वर्षीय खेळाडूशी दोन वर्षांचा करार केला आहे. एफसी गोवा संघात असताना जाहू प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला.

पणजी-  एफसी गोवातर्फे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दीर्घकाळ खेळलेला मोरोक्कन मध्यरक्षक अहमद जाहू याच्या करारावर मुंबई सिटीने गुरुवारी शिक्कामोर्तब केले. 

मुंबईतील संघाने या ३२ वर्षीय खेळाडूशी दोन वर्षांचा करार केला आहे. एफसी गोवा संघात असताना जाहू प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला. त्यापूर्वी मोरोक्कोतील मोघ्रेब तेतौआन संघाकडून असताना लोबेरा त्याचे प्रशिक्षक होते, आता पुन्हा मुंबई सिटी संघात त्याला लोबेरा यांचे मार्गदर्शन लाभेल. तो मोरोक्कोतील इत्तिहाद खेमिस्सेत, राजा कासाब्लांका, एफयूएस रबात या संघांतर्फेही खेळला आहे. आयएसएल स्पर्धेतील तीन मोसमात जाहू याने एफसी गोवाचे ५६ सामन्यांत प्रतिनिधित्व केले. या कालावधीत तो सुपर कप (२०१९) व लीग शिल्डचा (२०१९-२०) मानकरी ठरला.

संबंधित बातम्या