मुंबई सिटी प्रथमच ISLच्या अंतिम फेरीत; एफसी गोवावर 6-5 फरकाने मात

मुंबई सिटी प्रथमच ISLच्या अंतिम फेरीत; एफसी गोवावर 6-5 फरकाने मात
Mumbai City in ISL final for the first time beats FC Goa

बांबोळी : सोमवारी बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत सेमीफायनलच्या दुसर्‍या टप्प्यात माजी फायनलिस्ट असलेल्या एफसी गोवाला पराभूत करून मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीगच्या प्रथम फेरीची अंतिम फेरी गाठली. रॉवलिन बोर्जिस पेनल्टी शूटआऊटवर वेळेत फटका मारत मुंबई सिटीसाठी हिरो ठरला, तर एफसी गोवासाठी  ग्लेन मार्टिन्स खराब नेमबाजी केल्यामुळे व्हिलन ठरला.

उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील अंत्यंत संघर्षमय लढतीत 120 मिनिटे गोलशून्य बरोबरीनंतर पेनल्टीत 6-5 फरकाने आघाडी घेत 7व्या Indian Super League 2021 फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. कोच सर्जिओ लोबेरांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटीने पहिल्यांदाच ही कामगिरी केली आहे. तर, हुआन फेरांडोंच्या दिशादर्शनाखाली एफसी गोवा सहाव्यांदा प्ले-ऑफ फेर गाठण्यात यशस्वी ठरला.

स्पर्धेच्या सात सत्रात मुंबई सिटी एफसीने एकदादेखील अंतिम फेरीत प्रवेश केला नाही. प्रथमच लीग विनर्स शील्ड जिंकल्यानंतर मुंबईच्या संघाने या गौरवशाली मोसमात आणखी एक कामगिरी केली. गोव्याविरुद्ध पहिल्याच फेरीत मुंबईने 2-2 अशी बरोबरी साधली होती, तर विरोधी संघाने दोनदा आघाडी घेतली. परंतु, कालच्या सामन्यात मुंबई सिटीने दमदार कामगिरी करत एफसी गोवाला धोबीपछाड दिला. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com