बुमूससाठी मुंबई सिटीकडून कोट्यवधी रकमेची तयारी

किशोर पेटकर
बुधवार, 29 जुलै 2020

एफसी गोवाच्या सफल मध्यरक्षकासाठी १.६ कोटी रुपयांचा विक्रमी’ प्रस्ताव

पणजी : एफसी गोवाचा सफल मध्यरक्षक अदनान ह्युगो बुमूस याला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई सिटी एफसीने खेळाडू खरेदी अटी-नियमांनुसार १.६ कोटी रुपये मोजण्याची तयारी केल्याची माहिती आहे. मात्र या विक्रमी’ प्रस्तावास गोव्यातील संघाने अजून सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही

मोरोक्कन-फ्रेंच खेळाडू बुमूस याने सोमवारी सोशल मीडियाद्वारे आपण एफसी गोवाशी फारकत घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर एफसी गोवा संघाने निवेदन जारी करून हा २५ वर्षीय फुटबॉलपटू अजूनही संघाशी करारबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते. प्राप्त माहितीनुसारबुमूस आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) मोसमासाठी मुंबई सिटीच्या वाटेवर आहे. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी सिटी फुटबॉल ग्रुपचे व्यवस्थापन असलेल्या संघाने देशातील सर्वाधिक रकमेचा करार करण्यासाठी तयारी दर्शविली आहे.

गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत बुमूस याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळविताना १५ सामन्यांत ११ गोल व १० असिस्ट अशी चमकदार कामगिरी बजावली होती. ३१ मे २०२३ पर्यंत तो एफसी गोवा संघाशी करारबद्ध आहेपण त्याला आता हा करार तोडायचा आहे. मात्र नियमानुसार या खेळाडूस आपल्या संघात घेणाऱ्या क्लबला मूळ संघ एफसी गोवास ठरलेली रक्कम अदा करावी लागेल.

मुंबई सिटी एफसीने यापूर्वीच गतमोसमात आयएसएल लीग विनर्स शिल्ड जिंकलेल्या एफसी गोवा संघातील प्रमुख नावांना आपल्याकडे वळविले आहे. यामध्ये प्रशिक्षक सर्जिओ लोबेराएफसी गोवाकडून १०० सामने खेळलेला गोमंतकीय मंदार राव देसाईमोरोक्कोचा अहमद जाहूसेनेगलचा मुर्तदा फॉल यांचा समावेश आहे.

संपादन तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या