चेन्नईच्या विजयाने मुंबई पात्र

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

पराभव जवपास निश्‍चित झालेला असताना फलंदाजीस आलेल्या रवींद्र जडेजाने अवघ्या ११ चेंडूत नाबाद ३१ धावांची खेळी केली त्यामुळे चेन्नईने कोलकाताचा पराभव केला त्यामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरले. 

दुबई :  पराभव जवपास निश्‍चित झालेला असताना फलंदाजीस आलेल्या रवींद्र जडेजाने अवघ्या ११ चेंडूत नाबाद ३१ धावांची खेळी केली त्यामुळे चेन्नईने कोलकाताचा पराभव केला त्यामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरले.  १७३ धावांच्या आव्हानासमोर ऋतुराज गायकवाडने ७२ धावांची खेळी करुनही चेन्नईला विजयासाठी अखेरच्या १२ चेंडूत ३० धावांची गरज होती. त्यात अखेरच्या षटकांत दोन चेंडूत सात धावांची गरज असताना जडेजाने दोन षटकार मारुन चेन्नईला शानदार विजय मिळवून दिला.

शुभमन गिलसह वेगवान अर्धशतकी सलमी देणाऱ्या नितिश राणाने कोलकाताच्या फलंदाजीची जबाबदारी पुन्हा एकदा स्विकारली. तो मैदानात असला तरी धावांचा वेग फार नव्हता, परंतु कर्ण शर्माच्या एका षटकांत त्याने तीन षटकार मारले आणि तेथूनच गिअर बदलला. माजी कर्णधार दिनेश कार्तिकला सहाव्या क्रमांकावर पाठवण्यात आले, परंतु त्याने १० चेंडूत नाबाद २१ धावांची खेळी केल्यामुळे कोलकाताला १७२ ही आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. 
 

संबंधित बातम्या