Suryakumar Yadav Video: मुंबईचा सुर्या तळपला! 35 चेंडूत 83 धावा ठोकत 'हा' रेकॉर्डही केला

Video: मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धल ताबडतोड फलंदाजी केली.
Suryakumar Yadav Batting
Suryakumar Yadav BattingDainik Gomantak

Suryakumar Yadav Slams 83 runs, MI vs RCB: मंगळवारी मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या 54 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला.

मुंबईचा हा चालू हंगामातील सहावा विजय होता. मुंबईच्या या विजयात सूर्यकुमार यादवने ताबडतोड अर्धशतक करत मोठा वाटा उचलला.

बेंगलोरने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून सूर्यकुमार या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

त्यावेळी मुंबईने इशान किशनची 42 धावांवर विकेट गमावली होती. त्यानंतर लगेचच कर्णधार रोहित शर्मा (7) बाद झाला. पण यानंतर सूर्यकुमारने नेहल वढेराला साथीला घेतले.

Suryakumar Yadav Batting
Suryakumar Yadav: T20 मध्ये सूर्याची बादशाहत कायम, ICC ने केली 'ही' मोठी घोषणा!

सुर्यकुमारने सुरुवातीला थोडा वेळ घेतला होता. त्याने पहिल्या 14 चेंडू 18 धावाच केल्या होत्या. पण त्याने 11 व्या षटकात त्याचा पहिला षटकार मारला आणि त्यानंतर मात्र त्याने टॉप गिअर टाकला. त्याने त्यानंतर 26 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने त्याची लय कायम ठेवली.

त्याने मोहम्मद सिराज, विजय कुमार वैशाख, जोश हेजलवूड, वनिंदू हसरंगा अशा जवळपास बेंगलोरच्या सर्वच गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळले.

त्याच्या ताबडतोड फटकेबाजीमुळे तो जेव्हा १६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला तेव्हा मुंबईला विजयासाठी केवळ 8 धावांची गरज होती. त्याला विजय कुमार वैशाखने बाद केले. त्याचा केदार जाधवने झेल घेतला.

सूर्यकुमारने केवळ 35 चेंडूत 83 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याची ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील देखील सर्वोच्च खेळी ठरली. त्याने नेहल वढेराबरोबर 140 धावांची भागीदारीही केली.

Suryakumar Yadav Batting
Rahul Dravid चा रिपाॅर्ट कार्ड : ICC ट्रॉफी आणि टीम इंडियाच्या मधली 'वॉल' प्रशिक्षक तोडणार का?

दरम्यान, सूर्यकुमारने या खेळीदरम्यान आयपीएल कारकिर्दीत 3000 धावा पूर्ण करण्याचा टप्पाही ओलांडला आहे. तो आयपीएलमध्ये 3000 धावा पूर्ण करणारा एकूण 22 वा खेळाडूही ठरला आहे. तसेच 15 वा भारतीय खेळाडू ठरला. त्याने 134 सामन्यांत या 3000 धावा पूर्ण केल्या.

दरम्यान, सूर्यकुमार बाद झाल्यानंतरही मुंबईने हा सामना 16.3 षटकात 4 विकेट्स गमावत सहज जिंकला.

तत्पुर्वी या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिस (65) आणि ग्लेन मॅक्सवेल (68) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 199 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com