'रोहित शर्माला एक चूक पडली 12 लाखात'

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

मंगळवारी चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला.

मंगळवारी चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. दिल्ली कॅपिटलने मुंबईचा 6 गडी राखून पराभव केला. पराभवाशिवाय कर्णधार रोहित शर्माला आणखी एक धक्का बसला. रोहितवर 12 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी हा दंड आकारण्यात आला. ठरलेल्या वेळेत मुंबईचा संघ संपूर्ण गोलंदाजी करू शकला नाही. आयपीएलच्या या मोसमात प्रथमच मुंबईला कोड ऑफ कंडक्‍टमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. (Mumbai Indians' captain Rohit Sharma fined Rs 12 lakh)

IPL 2021: एमएस धोनीनंतर 'हा' खेळाडू असेल चेन्नईचा कर्णधार

90 मिनिटात 20 षटक पूर्ण करण्याचा नियम
नियमानुसार प्रत्येक संघाला आपले 20 षटक 90 मिनिटांत पूर्ण करावे लागतील. यापूर्वी 20 व्या षटकांला 90 व्या मिनिटांत सुरुवात करावी असा नियम होता पण आता दीड तासात कसल्याही परिस्थितीत 20 षटके पूर्ण करावी लागतात. 90 मिनिटात दोन्ही संघाना दीड-दीड मिनिटाचा टाइम आऊट दिला जातो. म्हणजेच संघांनी 85 मिनिटांत एकूण 20 षटके टाकली पाहिजेत. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये 14.11 षटके फेकणे आवश्यक आहे.

2010 नंतर चेन्नईच्या मैदानावर दिल्लीचा विजय
आतापर्यंत दिल्लीच्या संघाने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 9 सामने खेळले असून 3 विजय मिळवले आहेत. 2010 मध्ये दिल्लीने चेन्नईचा 6 गडी राखून पराभव केला. यानंतर, चेन्नईच्या मैदानावर 7 सामने खेळले आणि काल प्रथमच विजय मिळविला. 6 वेळा चेन्नई संघाने दिल्लीला पराभूत केले आहे.

AFC Champions 2021: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित

पुन्हा चूक केली तर २४ लाख रुपये दंड
या हंगामात रोहितने दुस्यांदा ही चूक केली तर त्याला 24 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. या व्यतिरिक्त त्याच्या संघातील खेळाडूंना सामना शुल्काच्या 25 टक्के दंड आकारला जाईल. जो 6 लाखांपेक्षा कमी असेल. त्याचबरोबर कर्णधारावर मॅच बंदी आणि तिसर्‍यांदा स्लो ओवर रेटसाठी 30 लाख दंड अशी तरतूद आहे. आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सला चार सामन्यात दुसरा पराभव झाला आणि संघ चार गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या