गतविजेत्या मुंबईची अंतिम फेरीत धडक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

रोहित शर्मा ०, किएरॉन पोलार्ड ० तरीही मुंबई २० षटकांटत ५ बाद २००. ताकदवर मंबईची हीच ताकद त्यांना आयपीएलच्या अंतिम फेरीत सहज स्थान मिळवून देणारी ठरली. भलीमोठी धावसंख्या उभारल्यानंतर या गतवित्यांनी दिल्लीचा ५७ धावांनी पराभव केला.

दुबई :  रोहित शर्मा ०, किएरॉन पोलार्ड ० तरीही मुंबई २० षटकांटत ५ बाद २००. ताकदवर मंबईची हीच ताकद त्यांना आयपीएलच्या अंतिम फेरीत सहज स्थान मिळवून देणारी ठरली. भलीमोठी धावसंख्या उभारल्यानंतर या गतविजेत्यांनी दिल्लीचा ५७ धावांनी पराभव केला.

मुंबई इंडियन्सने आजच्या या सामन्यात दिल्लीला चारीमुंड्या चीत केले. द्विशतकी धावा केल्यानंतर दिल्लीची तीन बाद शुन्य अशी अवस्था केली आणि दुसऱ्या षटकांतच मोठा विजय निश्‍चित केला. स्टॉयनिसने ६५ धावांची खेळी केल्यामुळे थोडीशी रंगत निर्माण झाली, पण बुमराने दुसऱ्या हप्त्यात त्याला बाद करुन एकूण चार विकेट मिळवण्याचा पराक्रम केला.

दिल्लीचे सलामीवीर पृश्‍वी शॉ ०, शिखर धवन ० आणि अजिंक्‍य रहाणे ० अशी दारुण अवस्था बोल्ट आणि बुमराने केली. बोल्टने पहिल्याच षटकात पृथ्वी आणि रहाणे यांना बाद केले त्यानंतर बुमारने धवनची यष्टी उखडल्यावर श्रेयस अय्यरला बाद केले.

त्याअगोदर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा भोपळा फोडू शकला नसला तरी डिकॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दहा धावांच्या सरासरीने सुरुवात करुन दिली होती. डिकॉकनंतर १२ व्या षटकांत सूर्यकुमार ३८ चेंडूत ५१ धावांची करुन बाद झाला त्यावेळी मुंबईच्या खात्यात १०० धावा झाल्या होत्या, परंतु पोलार्डही शुन्यावर माघारी फिरल्यावर मुंबई संघावर दडपण आले होते. दीडशे धावाही कठीण वाटत होत्या, परंतु ईशान किशनने एक बाजू सांभाळली त्याच्यासाथीला हार्दिक पंड्या आला आणि दुबईच्या स्टेडियमवर तुफान आले. या दोघांनी २३ चेंडूत नाबाद ६० धावांची भागीदारी करताना षटकारांचा पाऊसच पाडला त्यामुळे द्विशतकी धावा उभारता आल्या.
रबाडा आणि नॉर्किया हे वेगवान गोलंदाज दिल्लीची ताकद राहिलेले आहेत, या दोघांच्या ८ षटकात मुंबईकर फलंदाजांनी तब्बल ९२ धावा कुटल्या.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई २० षटकांत ५ बाद २०० (क्विन्टॉन डिकॉक ४० -२५ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, सूर्यकुमार यादव ५१ -३८ चेंडू, ६ चौकार, २ षटकार, ईशान किशन नाबाद ५५ -३० चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, हार्दिक पंड्या नाबाद ३७ -१४ चेंडू, ५ षटकार, अश्‍विन २९-३) वि. वि. दिल्ली २० षटकांत ८ बाद १४३ (स्टॉयनिस ६५ -४६ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, अक्षर पटेल ४२, ट्रेंट बोल्ट २/९ जसप्रित बुमरा 
४/१४)

संबंधित बातम्या