'आयपीएल'ला आज नवीन विजेता मिळणार ?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडकलेल्या दिल्ली कॅपिटल्सला किताबावर नाव कोरण्याची संधी असेल. मात्र, यासाठी त्यांना दिल्लीची अभेद्य भिंत भेदावी लागेल.

दुबईतील ५२ दिवसांच्या रोमांचानंतर आता आईपीएल स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विशेषत: कोरोना महामारीच्या काळात नकारात्मकतेने भरलेल्या या वातावरणात आयपीएलच्या आयोजनाने सकारात्मकता पसरायला मदत झाली. आज 10 नोव्हेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात मुंबई इंडियन्स आपल्या पाचव्या किताबासाठी दिल्लीशी भीडणार आहे. तर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडकलेल्या दिल्ली कॅपिटल्सला किताबावर नाव कोरण्याची संधी असेल. मात्र, यासाठी त्यांना दिल्लीची अभेद्य भिंत भेदावी लागेल.

कोण पडू शकतं कोणावर भारी? 

 आयपीएलच्या इतिहासात दोन प्रबळ दावेदार संघ बऱ्याच कमीवेळा एकमेकांविरोधात भीडतात. याही वेळेला असेच चित्र असून गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानी असणाऱ्या मुंबई आणि दिल्लीची तुलना करायची झाल्यास मुंबईने 15 मधून 10 सामने जिंकलेत आणि दिल्लीने 16 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबईच्या खेळाडूंनी सुरूवातीपासूनच आपला दबदबा निर्माण केला होता. मुंबईच्या फलंदाजांनी स्पर्धेत गोलंदाजांवर कायम दबाव ठेवला आहे. दिल्लीमध्ये मात्र अनुभवाची कमतरता असून केवळ शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनिस यांच्याव्यतिरिक्त इतर खेळाडूंना विशेष कामगिरी करता आलेली नाही.    

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे- 

मुंबई इंडियंस-  रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पैटिंसन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, मिशेल मैकलेनगन, मोहसिन खान, नाथन कोल्टर-नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डीकॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.

दिल्ली कैपिटल्स- श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस स्टॉइनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमेयर, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, कीमो पॉल, अमित मिश्रा, एनरिच नॉर्ट्जे, डैनियल सैम्स.

संबंधित बातम्या