मी कोणाच्याही मागे छडी घेऊन लागत नाही.. म्हणून आम्ही यशस्वी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

आपली नेतृत्वाची शैली हुकुमशाही नसल्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघ यशस्वी होत असल्याचे रोहित शर्माने सांगितले. रोहितच्या निर्णायक खेळीमुळे मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला पराजित करून आयपीएलचे विजेतेपद राखले.

दुबई :  आपली नेतृत्वाची शैली हुकुमशाही नसल्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघ यशस्वी होत असल्याचे रोहित शर्माने सांगितले. रोहितच्या निर्णायक खेळीमुळे मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला पराजित करून आयपीएलचे विजेतेपद राखले.

संघाचा कर्णधार असलो, तरी मी काही कोणाच्या छडी घेऊन मागे लागत नाही. खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावल्यास त्यांच्याकडून चांगली कामगिरी होते. अर्थात दोन्हींचा योग्य समन्वय राखणेही महत्त्वाचे असते, असे रोहित शर्माने सांगितले. विजेतेपदाच्या करंडकाचा स्वीकार केल्यानंतर रोहितने या यशात सपोर्ट स्टाफचाही मोलाचा वाटा असल्याचे आवर्जून सांगितले.

आम्हाला अजून काय हवे होते. पहिल्या चेंडूपासून हुकुमत राखली आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही, याचे श्रेय सपोर्ट स्टाफला द्यायला हवे. त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष होत असते. आयपीएलचा यंदाचा मोसम सुरू होण्यापूर्वीपासूनच आमची पूर्वतयारी सुरू झाली होती. असे रोहितने सांगितले.  सूर्यकुमार यादव धावचीत झाला, हे रोहितला सलत होते. सूर्यकुमारसाठी माझ्या विकेटचे बलिदान करायला हवे होते, असे रोहित म्हणाला. 

संबंधित बातम्या