IPL 2021 MIvsKKR: आज मुंबई vs कोलकत्ता सामना; होणार मोठे बदल 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

9 एप्रिल रोजी इंडियन प्रीमियर लीग च्या 14 व्या हंगामाला सुरवात झाली. 4 सामने झाले असून आज पाचवा सामना चेन्नईतील एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

9 एप्रिल रोजी इंडियन प्रीमियर लीग च्या 14 व्या हंगामाला सुरवात झाली. 4 सामने झाले असून आज पाचवा सामना चेन्नईतील एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना मुबई इंडियन्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. कोलकत्ता नाईट रायडर्सने आपला पाहिला सामना जिंकलेला आहे. तर दुसरीकडे मुंबईला सालाबादप्रमाणे आपला पहिला सामना गमवावा लागला होता. परंतु मुंबईचा आयपीएलचा इतिहास पहिला तर पहिले काही सामने हारून पण मुंबईने आयपीएल जिंकलेली आहे. त्यामुले मुंबई या सामन्यात कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Mumbai vs Kolkata match today There will be big changes)

एएफसी स्पर्धेत 'एफसी गोवा' चौथा गोमंतकीय संघ

कोलकत्ता विरुद्ध मुंबईचे रेकॉर्डस् 
कोलकत्ता विरुद्ध मुंबई तब्बल 21 सामने जिंकलेली आहे. तर दुसरीकडे कोलकत्ता फक्त 6 सामने जिंकलेली आहे. मुंबईचा संघ हा आयपीएलमधील तुल्यबळ संघ समजला जातो. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कोलकत्ताला हरवतो की कोलकत्ता मुंबईवर भारी पडतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. एम.ए.चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीचा विचार केला तर ही खळपट्टी गोलंदाजांची पोषक आहे. कारण दोन्हीही संघ खूप कमी सामने या स्टेडियमवरती खेळले आहे. वानखेडे आणि एडन गार्डन या ग्राउंडचा विचार केला तर ही दोन्हीही मैदाने तुलनेने छोटी आहेत. 

मुंबईच्या संघात बदल होण्याची शक्यता? 
मुंबईच्या संघात मागच्या हंगामात जोरदार कामगिरी करणारा क्विंटन डी कॉक पहिला सामना खेळाला नव्हता. या सामन्यात तो खेळले का याकडे लक्ष असणार आहे. एखाद्या फिरकी गोलंदाजांचा समावेश मुंबईच्या संघात होऊ शकतो. राहुल चहरच्या जागी पियुष चावलाचा समावेश होवू शकतो. कोलकत्ताच्या संघात कुठलाही बदल होण्याची शक्यता नाहीये कारण मागचा सामना जिंकल्यामुळे त्याच प्लेयिंग ११ सोबत संघ उतरेल.  

IPL 2021: खेळाडूंचे नाव घेत शाहरुखने केले KKRचे अभिनंदन, मात्र मॉर्गनचा उल्लेख...

मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कप्तान), क्रिस लिन/क्विंटन डी कॉक,ईशान किशन,किएरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर/पियुष चावला,मार्कस जेन्सन, जसप्रीत बुमराह, ट्रेंड बोल्ट  

कोलकाता नाईट रायडर्सचा संभाव्य संघ 
शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, ईयॉन मॉर्गन (कप्तान), दिनेश कार्तिक(विकेटकिपर), आंद्रे रसेल,साकिब अल हसन, हरभजन सिंग, पॅट कमिन्स, प्रसिद्ध क्रिष्णा, वरून चक्रवर्ती

 

संबंधित बातम्या