भारताच्या मुरली गावितला आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत रौप्यपदकाची संधी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

कारण रौप्यपदक जिंकणारा बहरीनचा हसन छानी याच्यावर ॲथलेटिक्‍स इंटेग्रिटी युनिटच्या शिस्तभंग समितीने ॲथलिट्‌स बायोलॉजिकल पासपोर्टमध्ये गडबड केल्याचा आरोप ठेवत बंदी टाकली आहे.

नागपूर: गतवर्षी दोहा येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकणाऱ्या भारताच्या मुरलीकुमार गावितला रौप्यपदकाची संधी आहे. कारण रौप्यपदक जिंकणारा बहरीनचा हसन छानी याच्यावर ॲथलेटिक्‍स इंटेग्रिटी युनिटच्या शिस्तभंग समितीने ॲथलिट्‌स बायोलॉजिकल पासपोर्टमध्ये गडबड केल्याचा आरोप ठेवत बंदी टाकली आहे. यामुळे त्याचे ऑगस्ट २०१७ ते मार्च २०२० पर्यंतचे सर्व निकाल अपात्र ठरविण्यात आले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या