सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखणे आवश्यक: फेरांडो

सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखणे आवश्यक असल्याचे मत स्पॅनिश प्रशिक्षकाने व्यक्त केले.
Juan Ferrando
Juan FerrandoDainik Gomantak

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमाची मोहीम पराभवाने सुरू झाल्यानंतर एफसी गोवाचे (FC Goa) प्रशिक्षक हुआन फेरांडो (Juan Ferrando) यांनी आपल्या संघाने अतिशय कमजोर खेळ केल्याचे मान्य केले. तो पराभव विसरून त्यांनी आता शुक्रवारी होणाऱ्या जमशेदपूर एफसीविरुद्धच्या लढतीवर लक्ष एकवटले आहे. सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखणे आवश्यक असल्याचे मत स्पॅनिश प्रशिक्षकाने व्यक्त केले.

एफसी गोवा आणि जमशेदपूर एफसी (Jamshedpur FC) यांच्यातील सामना बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. जमशेदपूरला ईस्ट बंगालने 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. बरोबरीच्या एका गुणासह किमान गुणतक्त्यात खाते उघडल्याचे समाधन जमशेदपूर एफसीला आहे. एफसी गोवास मुंबई सिटीकडून 0-3अशी नामुष्कीजनक हार पत्करावी लागली. त्यामुळे शुक्रवारी फेरांडो यांचा संघ जास्त दबावाखाली असेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाचा हा आयएसएल स्पर्धेतील सर्वांत मोठा पराभव ठरला.

Juan Ferrando
माजी बंगळूर एफसीच्या पराभवाचे मुख्य कारण बनले सुपरस्टार खेळाडूचे अपयश

नवोदितांवर प्रशिक्षकांचा विश्वास

एफसी गोवा संघात सध्या नवोदित चेहरे जास्त दिसत आहे. त्यांच्या अननुभवाचा परिणाम संघाच्या कामगिरी होत आहे, मात्र फेरांडो यांनी संघातील नवोदितांची पाठराखण करताना त्यांच्यावर विश्वास प्रदर्शित केला. त्यांच्यापाशी अनुभव नसला, तरी खेळूनच ते अनुभवसंपन्न बनतील, असे फेरांडो यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘आम्ही पराभूत झालो आणि त्याबद्दल कारणे देत राहणार नाही. माझे नियोजन यशस्वी ठरू शकले नाही असे तुम्ही मानू शकता, परंतु या खेळाडूंवर माझा भरवसा आहे. अननुभवाबाबतची चर्चा मी समजू शकतो. तरीही, मुख्य प्रशिक्षक या नात्याने या खेळाडूंना मदत करणे हेच माझे मुख्य काम आहे. ते आमचे भविष्य आहे. तथापि, कामगिरी चांगली झाली नाही. आम्हाला या खेळाडूंवर आणखी मेहनत घेतल्यानंतर संधी देणे गरजेचे आहे. सराव सत्रात चुकांवर काम करून त्यावर मात करावी लागेल,’’ असे फेरांडो म्हणाले.

‘‘निकाल पचविणे तेवढे सोपे नसते. माझ्या दृष्टिकोनातून, पहिल्या सामन्यातील आमची कामगिरी अजिबात चांगली नव्हती. पण आता मी उद्याचा विचार करत आहे. आमच्यासाठी नवे आव्हान आहे आणि त्या लढतीवर लक्ष केंद्रीत करणे जास्त महत्त्वाचे आहे.’’

- हुआन फेरांडो,

मुख्य प्रशिक्षक एफसी गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com