आवडता सेलेब्रिटी म्हणून मीरा राजपूतने घेतले या क्रिकेटरचे नाव

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत(mira rajput) नेहेमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसमवेत  प्रश्न-उत्तरांचा मनोरंजक खेळ खेळत असते.

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत(mira rajput) नेहेमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसमवेत  प्रश्न-उत्तरांचा मनोरंजक खेळ खेळत असते. अलीकडे, मीरा  राजपूतने  अनेक रोचक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पण मजेची गोष्ट अशी आहे की या प्रश्नांमुळे तिचा नवरा आणि बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला(shahid kapoor) थोडासा धक्का बसू शकतो. कारण जेव्हा शाहिद कपूर आणि त्याच्यासोबत आणखी कोणाला निवडशील अस विचारलं असता, ती म्हणाली क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्स आयपीएलमधील चमकदार खेळीसाठी ओळखला जातो. आपल्या आकर्षक फटक्यांनी तो सर्वांचीच मने जिंकत असतो. (Cricketer AB de Villiers Mira Rajput's favorite celebrity find out why)

शाहीद आफ्रिदी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर भडकला; जाणून घ्या

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला विचारण्यात आले की शाहिद कपूर आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यात सर्वात आवडता सेलिब्रिटी कोण आहे? यावर मीराने खूप मजेदार उत्तर दिले. ती म्हणाली, 'एबी डिव्हिलियर्स ... मीरा राजपूतला दुसरा प्रश्न विचारण्यात आला, क्रिकेट की फुटबॉल? तर मीरा म्हणाली, 'एबी क्रिकेट खेळतो, म्हणूनच मी क्रिकेट पाहते.' अशाप्रकारे मीरा राजपूतनेही चाहत्यांच्या अतिशय मजेदार प्रश्नांना तितकीच मजेदार उत्तरे दिली आहेत.

IPL2021 : मायकल जॅक्सनच्या गाण्यावर ख्रिस गेलचा अफलातून डान्स; पहा व्हिडिओ 

दरम्यान, आयपीएल 2021 सुरू होणार आहे. येत्या 9 एप्रिल रोजी पहिला सामना हा मुंबई इंडियन्स VS रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या रंगणार आहे, आणि या पहिल्याच सामन्यात एबी डिव्हिलिअर्स खेळताना दिसणार आहे. पाहुयात आता तो आपल्या खेळीने कशी सर्वाना भुरळ पडतो.  

संबंधित बातम्या