यूएस ओपन टेनिस : नाओमी ओसाकाची दुसरे अमेरिकन, तर तिसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद 

वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

पहिला सेट गमावूनही निर्धार कायम ठेवणाऱ्या जपानच्या, परंतु अमेरिकेत स्थायिक असलेल्या नाओमी ओसाकाने व्हिक्‍टोरिया अझारेंकाचा १-६, ६-३, ६-३ असा पराभव करून अमेरिकन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. हे तिचे दुसरे अमेरिकन आणि तिसरे ग्रॅंड स्लॅम अजिंक्‍यपद आहे.

न्यूयॉर्क: पहिला सेट गमावूनही निर्धार कायम ठेवणाऱ्या जपानच्या, परंतु अमेरिकेत स्थायिक असलेल्या नाओमी ओसाकाने व्हिक्‍टोरिया अझारेंकाचा १-६, ६-३, ६-३ असा पराभव करून अमेरिकन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. हे तिचे दुसरे अमेरिकन आणि तिसरे ग्रॅंड स्लॅम अजिंक्‍यपद आहे.

आपली बलस्थान काय आहेत, याचा मी विचार केला आणि त्यानुसार खेळ केला. त्यामुळे पहिला सेट गमावूनही मला विजयश्री मिळाली. २०१८ च्या अंतिम सामन्यातही मी असाच विचार आणि निर्धार केला होता, असे २२ वर्षीय ओसाकाने सांगितले. २०१८ च्या स्पर्धेत तिने सेरेना विल्यम्सचा पराभव करून विजेतेपदाबरोबर आपली क्षमता सिद्ध केली होती.

यंदाच्या स्पर्धेत ओसाकाची प्रतिस्पर्धी असलेल्या ३१ वर्षीय अझारेंकाने पहिला सेट अवघ्या २६ मिनिटांत ६-१ असा जिंकून शानदार सुरुवात केली होती. या सेटमध्ये ओसाकाचा खेळ स्वैर होता. तिने तब्बल १३ सोप्या चुका केल्या होत्या. दुसऱ्या सेटचीही सुरुवात तशीच होती, अझारेंकाने सर्व्हिस ब्रेक मिळवून २-० अशी आघाडी घेतली तेव्हा अनेकांना सामन्याचा निकाल काय लागणार, याचा अंदाज येऊ लागला होता; परंतु लढवय्यी ओसाकाने तेथूनच सामन्याला कलाटणी देण्यास सुरुवात केली आणि ४-३ अशी आघाडी घेतल्यावर मागे वळून पाहिले नाही.

पराभवातही आनंद
पहिला सेट जिंकल्यानंतरही विजेतेपद हातून निसटल्यानंतही अझारेंका दुःखी नव्हती. मला स्वतःचा अभिमान आहे, असे सांगून ती म्हणाली, अशा प्रकारचा चुरशीचा सामना बऱ्याच सामन्यानंतर झाला, त्याचे मला समाधान आहे. मात्र विजेतेपदाचा आनंद फार वेगळा असतो, असे अझारेंकाने सांगितले. 

संबंधित बातम्या