नसीम शाहच्या दुखापतीनं वाढवलं पाकिस्तानचं टेन्शन, वर्ल्ड कप 2023 मधून...
Pakistan Cricket Team: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. यातच आता, पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या एवदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तो खेळू शकणार नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
श्रीलंकेत सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सुपर फोर सामन्यात 20 वर्षीय गोलंदाज नसीम जखमी झाला होता.
भारतीय डावाच्या 46 व्या षटकात उजव्या खांद्याच्या स्नायूला दुखापत झाल्याने नसीम सामन्यातून बाहेर गेला होता.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्याच्या स्कॅनचे विश्लेषण केले, ज्यावरुन असे दिसून आले आहे की, तो यावर्षी खेळू शकणार नाही. अशास्थितीत यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतून तो बाहेर होऊ शकतो.
पीसीबी नसीमच्या दुसऱ्या स्कॅन रिपोर्टची वाट पाहत आहे. आशिया चषक स्पर्धेत संघाने नसीमच्या जागी जमान खानला संधी दिली होती, मात्र श्रीलंकेविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानला (Pakistan) अंतिम फेरी गाठता आली नाही.
दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी शाह वेळेत बरा होण्याच्या शक्यतेवर शंका व्यक्त केली होती.
तथापि, वेगवान गोलंदाज हारिस रौफ हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरा झाला आहे. विशेष म्हणजे, 6 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो फिट होईल, असे बाबरने सांगितले.
गुरुवारी जेव्हा संघ श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) मैदानात उतरला तेव्हा हे दोन्ही खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये बसले होते.
बाबर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला होता की, याबाबत मी तुम्हाला नंतर सांगेन. हारिस रौफची स्थिती फारशी वाईट नाही. त्याच्या स्नायूंवर ताण आला आहे, पण तो विश्वचषकापूर्वी या दुखापतीतून सावरेल.''
तो पुढे म्हणाला होता की, ''नसीम शाहही दुखापतीतून सावरत आहे. तो विश्वचषकातील काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. मात्र, मला अद्याप दुखापतीसंबंधी आणि त्यातून बरे होण्याची टाइमलाइन माहित नाही. पंरतु विश्वषकासाठी दोन्हीही गोलंदाज फिट होतील अशी आशा आहे.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.