राष्ट्रीय कार रेसिंगचा मोसमही लवकरच सुरू होणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

राष्ट्रीय कार रेसिंग मोसमास शनिवारी सुरुवात होणार आहे. नऊ महिन्यांच्या ब्रेकनंतर या मोसमातील दुसरी फेरी घेण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रेक्षकांविना होणाऱ्या या शर्यतीच्या वेळी पाहुण्यांनाही प्रवेश नसेल.

चेन्नई : राष्ट्रीय कार रेसिंग मोसमास शनिवारी सुरुवात होणार आहे. नऊ महिन्यांच्या ब्रेकनंतर या मोसमातील दुसरी फेरी घेण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रेक्षकांविना होणाऱ्या या शर्यतीच्या वेळी पाहुण्यांनाही प्रवेश नसेल. प्रत्येक स्पर्धकासह दोनच सहायक असतील. गेल्या महिन्यात दुचाकींसाठी असलेली राष्ट्रीय ड्रॅग रेसिंग स्पर्धा झाली होती. आता या आठवड्यात कार रेसिंग होणार आहे. त्या वेळी रेसिंग शर्यतीस उपस्थित राहणाऱ्यांचे तापमान तपासण्यात येईल. मास्कशिवाय प्रवेश नसेल, तसेच सुरक्षित अंतर बंधनकारक आहे.

संबंधित बातम्या