गोव्याऐवजी अन्यत्र राष्ट्रीय स्पर्धा घेण्याविषयी चाचपणी

Dainik Gomantak
सोमवार, 1 जून 2020

छत्तीसगडउत्तराखंडसह मेघालयही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यास इच्छुक असल्याचे बत्रा यांनी मागील गोवा भेटीत नमूद केले होते

पणजी

आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्याऐवजी अन्य राज्यात घेण्याच्या पर्यायांची चाचपणी भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) करत असून त्यासंबंधी संकेत मिळू लागलेत.

गोवा सरकारने गेल्या गुरुवारी कोविड-१९ महामारीचे कारण देत ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकलीपण हा निर्णय एकतर्फी’ असल्याचे आयओएला वाटत आहे.

आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी नवी दिल्लीतील प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरूनकोणतीच कल्पना न देता अथवा सल्लामसलत न करता स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याच्या गोवा सरकारच्या निर्णयाने आयओए नाराज असल्याचे दिसून येते.

आयओएच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत गोव्याने घेतलेल्या निर्णयावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. स्पर्धा लांबणीवर टाकताना आयओएला विश्वासात घेतले नसल्याने त्याचे तीव्र पडसाद बैठकीत उमटू शकतातअसे गोवा ऑलिंपिक संघटनेच्या (जीओए) पदाधिकाऱ्यास वाटते.

२०१६ पासून वारंवार लांबणीवर पडलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित होती. ‘‘राष्ट्रीय स्पर्धा आयोजन समितीने कोविड-१९ महामारीमुळे राष्ट्रीय स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आयोजन समितीची पुढील बैठक सप्टेंबरच्या अखेरीस होईल आणि त्यानंतर स्पर्धेच्या तारखा निश्चित करण्यात येतील. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा सल्ला सरकार घेईल. स्पर्धा घेण्यासाठी चार महिने आगावू नोटीस आवश्यक आहे,’’ असे क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी गुरुवारी आयोजन समितीच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितले होते. या वक्तव्यावरून स्पर्धेविषयी निर्णय घेताना गोवा सरकारने आयओएला दुर्लक्षित केल्याचे जाणवत आहे, ‘आयओएलाही ते खटकले असल्याचे समजते.

टोकियो ऑलिंपिकला प्राधान्य

पुढील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेस आता प्रथम प्राधान्यक्रम असल्याचे आयओएचे अध्यक्ष बत्रा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बेमुदत लांबणीवर टाकलेली राष्ट्रीय स्पर्धा टोकियो ऑलिंपिकपूर्वी गोव्यात होण्याची अजिबात शक्यता नाही. २०२१ सालची टोकियो ऑलिंपिक स्पर्धा झाल्यानंतर लगेच पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत आयओए चाचपणी करेल.

 तीन राज्ये इच्छुक

छत्तीसगडउत्तराखंडसह मेघालयही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यास इच्छुक असल्याचे बत्रा यांनी मागील गोवा भेटीत नमूद केले होते. २०२२ मध्ये मेघालय राज्य स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्षी आहेत्यामुळे त्या वर्षी स्पर्धेचे आयोजन मिळावे यासाठी मेघालय इच्छुक असल्याची माहितीही बत्रा यांनी मागे दिली होती. छत्तीसगड आणि उत्तराखंडनेही पुढील स्पर्धा घेण्यास खूपच उत्सुकता दाखविली असल्याचे बत्रा यांचे म्हणणे आहे.

 आयओएची मंजुरी आवश्यक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी आयओएची परवानगी अत्यावश्यक असतेत्यामुळे गोव्याला स्पर्धेचे नवे वेळापत्रक ठरविताना आयओएची मंजुरी पुन्हा घ्यावी लागेल. गोव्यातील स्पर्धेस पुन्हा मान्यता देण्यासाठी, ‘आयओएच्या कार्यकारी मंडळ आणि आमसभेकडे जावे लागेलअसे आयओए अध्यक्षांनी सूचीत केले आहे.

संबंधित बातम्या