राष्ट्रीय सबज्युनियर हॉकी स्पर्धा : दादरा-नगर हवेली उपांत्यपूर्व फेरीत

गतविजेत्या झारखंडसमोर चंडीगडचे आव्हान
National Sub-Junior Hockey Tournament
National Sub-Junior Hockey TournamentDainik Gomantak

पणजी: दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव संघाने ड गट लढतीत मणिपूरला 9-0 फरकाने धुव्वा उडवून 12 व्या राष्ट्रीय सबज्युनियर हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या गटातील अन्य एका लढतीत हिमाचलने राजस्थानचा 5- 1 फरकाने पराभव केला, पण त्यांना बाद फेरी गाठता आली नाही. (National Sub-Junior Hockey Tournament: Dadra-Nagar Haveli in the quarterfinals )

National Sub-Junior Hockey Tournament
IPL 2022|इशान किशनने केली चूक मान्य

स्पर्धा पेडे-म्हापसा येथील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानावर सुरू आहे. गतविजेते झारखंड, हरियाना, उत्तर प्रदेश, ओडिशा, पंजाब, बिहार आणि चंडीगड या संघांनीही बाद फेरी गाठली आहे. या फेरीतील सामने गुरुवारी (ता. 12 ) खेळले जातील.

National Sub-Junior Hockey Tournament
एफसी गोवाच्या मोहिमेचा विजयी समारोप

उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लढतीत झारखंडसमोर चंडीगडचे आव्हान असेल, नंतर हरियाना विरुद्ध बिहार, उत्तर प्रदेश विरुद्ध पंजाब आणि दादरा-नगर हवेली-दमण-दीव विरुद्ध ओडिशा यांच्यात लढती होतील.

मणिपूरविरुद्ध दादरा-नगर हवेली संघासाठी श्रीजन यादव याने दोन, तर प्रमोद पाल, शुभम राजभर, पियुष सिंग, मनजित राजभर, रवींद्रप्रताप यादव, रितेश पांडे व विजय राय यांनी प्रत्येकी एक गोल केला. अन्य लढतीत हिमाचलसाठी सतविंदर सिंग व हर्ष यांनी प्रत्येकी दोन, तनीष कुमारने एक गोल केला. राजस्थानचा एकमात्र गोल नमन पटेल याने नोंदविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com