National Subjunior Football: गोव्याच्या मुलांचा हरियानावर मात करत शानदार विजय

मुलींचा सलग दुसरा पराभव
Football
Football Dainik Gomantak

National Subjunior Football: पश्चिम बंगालमधील बेरहामपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सबज्युनियर मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या मुलांनी मंगळवारी हरियानावर 7-2 फरकाने शानदार विजय नोंदविला.

मणिपूरविरुद्ध दहा गोल फरकाने पराभूत झाल्यानंतर स्पर्धेच्या ब गटात गोव्याने मंगळवारी शानदार खेळ केला. हरियानाच्या राकेश याने चौथ्या मिनिटास स्वयंगोल केल्यानंतर मेस्सी कुलासो याने २७व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे गोव्याचा संघ विश्रांतीला २-० फरकाने आघाडीवर होता.

Football
Asmita Khelo India Women’s League: खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंगला प्रतिसाद

नंतर उत्तरार्धातील खेळात ब्रायसन डायस (६९वे मिनिट), श्लोक गोवेकर (७२वे मिनिट), तनीश तेंडुलकर (७७वे मिनिट), एलरॅड ब्रागांझा (८९वे मिनिट), तसेच मेस्सी कुलासो याने ९०+३ मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. गोव्याचे आता दोन लढतीनंतर तीन गुण झाले आहेत.

गोव्याच्या मुलींना मात्र राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी सुधारित खेळाचे प्रदर्शन केले. पंजाबमधील अमृतसर येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या अ गटात पहिल्या लढतीत झारखंडने गोव्याचा १६-१ असा धुव्वा उडविला होता. मंगळवारी त्यांना तमिळनाडूने १-० असे निसटते हरविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com