ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने मानले चाहत्यांचे आभार

महामारीसारख्या कठीण काळात नीरजने करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. तसेच त्याने इतिहास घडवला आहे.
Neeraj Chopra

Neeraj Chopra

Dainik Gomantak

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा भालाफेकपटू नीरज चोप्राचा आज वाढदिवस आहे. आज 24 डिसेंबर रोजी तो 24 वर्षांचा झाला आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन झाल्यानंतरचा त्याचा हा पहिला वाढदिवस आहे. सोशल मीडियावर नीरजचे अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली आहे. यामुळेच तो ट्विटर ट्रेंडमध्ये टॉपवर पोहोचला आहे. महामारीसारख्या कठीण काळात नीरजने करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम केले आहे.

<div class="paragraphs"><p>Neeraj<em> </em>Chopra</p></div>
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया मांगे मोर!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Olympics) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा आज 24 डिसेंबर रोजी 24 वर्षांचा झाला आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन झाल्यानंतर त्याचा हा पहिला वाढदिवस आहे. सोशल मीडियावर नीरजचे अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली आहे. यामुळेच तो ट्विटर ट्रेंडमध्ये टॉपवर पोहोचला आहे. चाहत्यांनी सांगितले की, महामारीसारख्या कठीण काळात नीरजने करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. तसेच त्याने इतिहास घडवला आहे.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानत नीरज चोप्रा (neeraj chopra) ट्विटरवर म्हणाला, 'सर्वांना नमस्ते. ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे खूप खूप आभार. मला आशा आहे की तुम्ही सर्व आनंदी आहात, मी देखील खूप आनंदी आहे. मी सध्या अमेरिकेत आहे. ट्रेनिंग वरून परत आल्यानंतर मी तुम्हा सर्वांचे मेसेज पाहिले. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मी आता जेवत आहे.' व्हिडिओमध्ये नीरज चोप्राचे प्रशिक्षक म्हणाले, 'नमस्ते. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वजण तुमची काळजी घ्या.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com