आसमान पार.. जमीन पे.. अन् पाण्याखाली, निरजच्या डोक्यात फक्त भालाफेकीचाच विचार... पहा व्हिडियो

टोकियो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics) परत आल्यापासून नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. या स्टार अॅथलीटने आता त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वत:साठी वेळ काढत, सध्या मालदीवमध्ये (Maldives) सुट्टीवर आहे. सुट्टीच्या काळातही, नीरज फक्त त्याच्या खेळाद्दलच विचार करताना दिसत आहे.
आसमान पार.. जमीन पे.. अन् पाण्याखाली, निरजच्या डोक्यात फक्त भालाफेकीचाच विचार... पहा व्हिडियो
सुट्टीच्या काळातही, नीरज (Neeraj Chopra) फक्त त्याच्या खेळाद्दलच विचार करताना दिसत आहे. Instagram /@neeraj____chopra

नवी दिल्ली: टोकीयो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भालाफेक (Javelin throw) प्रकारात भारताला सुवर्ण पदक (India won the gold medal) मिळवून देऊन भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने सर्व देशावासीयांची मने जिंकली आहेत. हरियाणाच्या पानिपत येथे राहणाऱ्या या 23 वर्षीय शेतकऱ्याच्या मुलाने 87.58 मीटर अंतरावर भाला फेकून भारतासाठी पहिले ट्रॅक अँड फील्ड सुवर्णपदक पटकावले.

सुट्टीच्या काळातही, नीरज (Neeraj Chopra) फक्त त्याच्या खेळाद्दलच विचार करताना दिसत आहे.
नीरज चोप्रा बॉलिवूडमधील 'या' कलाकारांचा आहे खूप मोठा फॅन

टोकियो ऑलिम्पिकमधून परत आल्यापासून नीरज अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. या स्टार अॅथलीटने आता त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वत:साठी वेळ काढत, सध्या मालदीवमध्ये सुट्टीवर आहे. सुट्टीच्या काळातही, नीरज फक्त त्याच्या खेळाद्दलच विचार करताना दिसत आहे. कारण निरजने इन्स्टाग्रामवर स्कूबा डायव्हिंग करत भाला फेकतानाचा व्हिडिओ एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे. त्या व्हिडियोला त्याने "आसमान पार, जमीन पे, आणि पाण्याखाली, मी फक्त भालाफेकीचाच विचार करतो! असे कॅप्शन लिहिले आहे.

टोकियोमध्ये पदकतालिकेत भारत 48 व्या स्थानावर राहिला, भारताला एकूण सात पदके मिळाली आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारताची मागील सर्वोत्तम कामगिरी 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये होती, ज्यामध्ये भारताला सहा पदके मिळाली होती. मीराबाई चानू (वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक), पीव्ही सिंधू (बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक), बजरंग पुनिया (कुस्तीमध्ये रौप्य पदक) आणि रवी कुमार दहिया (कुस्तीमध्ये रौप्य पदक), भारताचा पुरुष हॉकी संघ (कांस्यपदक), लवलिना बोर्गोहेन (बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक पदक) आणि नीरज चोप्रा (भालाफेक मध्ये सुवर्णपदक) यांनी टोकीयो ऑलिंपिक 2020 मध्ये भारतासाठी पदके मिळविली आहेत.

Related Stories

No stories found.