पाठीच्या दुखापतीमुळे नीरज चोप्रा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही

भालाफेकपटू नीरज चोप्राला दीर्घ आंतरराष्ट्रीय हंगाम आणि पाठीच्या दुखापतीमुळे आगामी राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेणे कठीण जात आहे.
Neeraj Chopra
Neeraj Chopra Dainik Gomantak

Neeraj Chopra Injury: भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) सूचना असूनही, चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राला दीर्घ आंतरराष्ट्रीय हंगाम आणि पाठीच्या दुखापतीमुळे आगामी राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेणे कठीण जात आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने गुरुवारी झुरिचमध्ये प्रतिष्ठित डायमंड लीग फायनल विजेतेपद जिंकून आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. हे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला. दरम्यान, IOA ने देशातील अव्वल खेळाडूंना खेळांमध्ये भाग घेणे अनिवार्य केले आहे, ज्यामुळे अनेक खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षण वेळापत्रकात सुधारणा करावी लागेल.

एका दिवसानंतर, त्याला 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत गुजरातमधील विविध शहरांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा निरज चोप्राने सांगितले की, 'राष्ट्रीय खेळ जवळ येत आहेत. मी सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. मी एक किंवा दोन आठवडे प्रशिक्षण घेऊ शकणार नाही. त्यामुळे मी प्रामुख्याने पुढील वर्षी होणाऱ्या खेळांवर लक्ष केंद्रित करत आहे.'

Neeraj Chopra
Neeraj Chopra Injury: भारताच्या आशांना मोठा धक्का, नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

या दुखापतीमुळे चोप्रा या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र, त्याने 26 ऑगस्ट रोजी डायमंड लीग मालिकेत एंट्री घेतली आणि आंतरराष्ट्रीय हंगामाचा विजेता म्हणून शानदार कामगिरी केली. डायमंड लीग मीटमध्ये सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने लुसाने येथे 89.08 मीटरच्या तिसऱ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले.

Neeraj Chopra
Diamond League ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय

ज्यूरिखमध्ये चोप्राने फाऊलपासून सुरुवात केली पण दुसऱ्या प्रयत्नात 88.44 मीटर भाला फेकून अव्वल स्थान गाठले. त्याच्या कारकिर्दीतील ही चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे ज्याने त्याला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने पुढील चार प्रयत्नांमध्ये 88.00 मीटर, 86.11 मीटर, 87.00 मीटर आणि 83.60 मीटर फेकले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जेकोब वादलेच्चोलाने 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. चौथ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले. त्यानंतर जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 83.73 मीटरसह तिसरे स्थान पटकावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com