Women's World Championships 2023: महिला वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत नीतू घंघासने जिंकले 'सुवर्ण', भारताला अजून...

Women's World Championships 2023: कॉमनवेल्थ गेम्सची सुवर्णपदक विजेती नीतू घनघस ही सहावी भारतीय बॉक्सर बनली आहे जी जगज्जेते ठरली आहे.
Neetu Ghanghas
Neetu Ghanghas Dainik Gomantak

Women's World Championships 2023: भारताची स्टार बॉक्सर नीतू नीतू घंघास (48 किलो) हिने शनिवारी मंगोलियाच्या लुत्साईखान अल्तानसेतसेगचा पराभव करुन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्सची सुवर्णपदक विजेती नीतू घंघास ही सहावी भारतीय बॉक्सर बनली आहे, जी जगज्जेती ठरली आहे.

दरम्यान, एकही गुण न गमावता नीतू घंघासने शानदार कामगिरी करत अल्तानसेटसेगचा 5-0 असा पराभव करुन विजेतेपद पटकावले. नीतूने आक्रमक सुरुवात केल्यामुळे तिला हे विजेतेपद मिळवता आले. तिने आशियाई चॅम्पियन कझाकिस्तानच्या (Kazakhstan) अलुआ बाल्किबेकोवाचा 5-2 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आहे

मेरी कोम (2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018), सरिता देवी (2006), जेनी आरएल (2006), लेखा केसी (2006), आणि निखत जरीन (2022) नंतर अशी कामगिरी करणारी ती सहावी भारतीय खेळाडू ठरली आहे.

नीतूसह भारताच्या इतर तीन स्टार बॉक्सर्सनीही या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. निखत जरीनने (50 किलो) रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या कोलंबियाच्या इंग्रिड व्हॅलेन्सियाचा 5-0 असा पराभव केला तर लोव्हलिना बोर्गोहेनने (75 किलो) चीनच्या ली कियानचा 4-1 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. तर स्वीटी बूरा (81 किलो) हिने ऑस्ट्रेलियाच्या (Australia) स्यू-एम्मा ग्रीनट्रीचा 4-3 असा पराभव करुन तिची दुसरी जागतिक स्पर्धा गाठली.

भारताला आणखी 3 सुवर्ण जिंकण्याची संधी आहे

अंतिम फेरीत निकहतचा सामना दोन वेळची आशियाई चॅम्पियन व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमशी होणार आहे. रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये लोव्हलिनाचा सामना ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करशी होणार आहे.

तर स्वीटीचा सामना चीनच्या वांग लीनाशी होणार आहे. एकूणच या स्पर्धेत भारताला अजून तीन सुवर्णपदके मिळू शकतात. या मोठ्या स्पर्धेत भारताच्या मुलींनी नेहमीच आपल्या देशाचे नाव उंचावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com