Netherlands vs Qatar: यजमान कतारचा तिसरा पराभव; नेदरलँडचा 2-0 ने विजय

नेदरलँडच्या कोडी गॅक्पो याचा सलग तिसऱ्या सामन्यात गोल
Netherlands vs Qatar
Netherlands vs QatarDainik Gomantak

Netherlands vs Qatar: फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी ग्रुप ए मधील सामन्यात नेदरलँडने यजमान कतारचा 2-0 गोलफरकाने पराभव केला. यजमान कतारचा हा तिसरा पराभव आहे. या स्पर्धेत कतारला यापुर्वी सेनेगल आणि इक्वाडोर या संघांनी पराभूत केले.

(FIFA World Cup 2022)

Netherlands vs Qatar
Cricket Record: हा रेकॉर्ड आजही कायम, 6 चेंडूत 77 धावा; या खेळाडूचा जलवा पाहून...!

पुर्वार्धात नेदरलँडच्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या 26 व्या मिनिटाला नेदरलँडने पहिला गोल नोंदवला. त्यांचा स्ट्रायकर कोडी गॅक्पो याने हा गोल केला. उत्तरार्धातील खेळाला सुरवात होताच मिडफिल्डर फ्रँकी डी जॉन्ग याने 49 व्या मिनिटाला नेदरलँडकडून दुसरा गोल नोंदवला.

गॅक्पो याने सलग तिसऱ्या सामन्यात गोल नोंदवला आहे. आणि सलग तीन सामन्यांत गोल नोंदवणारा तो नेदरलँडचा चौथा फुटबॉलपटू ठरला आहे. यापुर्वी नेदरलँडकडून जोहान नीसकेन्स, डेनिश बर्गकॅम्प आणि वेस्ले श्नाइडर यांनी अशी कामगिरी केली होती.

Netherlands vs Qatar
Sanju Samson: क्रिकेट स्टेडियममध्येच नाही, तर फिफा वर्ल्डकपमध्येही पोहचले सॅमसनचे फॅन्स; Photos

या विजयानंतर नेदरलँडने ग्रुप ए मध्ये सर्वाधिक गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. स्पर्धेतील कतार संघाचे आव्हान यापुर्वीच संपुष्टात आले आहे. दरम्यान, नेदरलँडचा संघ 2018 मध्ये वर्ल्डकपमध्ये खेळू शकला नव्हता. तथापि, नेदरलँड आत्तापर्यंतच्या वर्ल्डकप स्पर्धेत 10 वेळा अंतिम 16 संघात पोहचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com