Netherlands vs USA: ऑरेंज आर्मी 8 वर्षानंतर क्वार्टर फायनलमध्ये

अमेरिकेवर नेदरलँडची 3-1 गोलफरकाने मात
Netherlands vs USA
Netherlands vs USADainik Gomantak

Netherlands vs USA: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत आजपासून नॉकआऊट राऊंडला सुरवात झाली आहे. या राऊंडमधील पहिल्याच सामन्यात ऑरेंज आर्मी नेदरलँडने अमेरिकेवर 3-1 अशा गोलफरकाने मात करत क्वार्टर फायनल फेरीत प्रवेश केला आहे.

(FIFA World Cup 2022)

Netherlands vs USA
Viral Video Of Cameroon's Footballer: गोल करून बलाढ्य ब्राझिलला पराभूत करणाऱ्या कॅमेरूनच्या खेळाडूचा व्हिडिओ व्हायरल

सामन्याच्या दहाव्याच मिनटाला नेदरलँडने गोल नोंदवत आघाडी घेतली. बार्सिलोना क्लबकडून खेळणाऱ्या त्यांच्या मेम्फिस डिपाय याने डेन्झेल डम्प्रीज याच्या पासवर हा गोल नोंदवला. या वर्ल्डकपमध्ये प्रथमच नेदरलँडकडून पहिला गोल कोडी गॅक्पो शिवाय इतरांनी नोंदवला. पुर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर भरपाई वेळेत (45+1) नेदरलँडच्या डाले ब्लाईंड याने गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

Netherlands vs USA
FIFA World Cup 2022: 'राऊंड ऑफ 16'चा थरार आजपासून, जाणून घ्या टाईमटेबल

अमेरिकेच्या हाजी राईट याने 76 व्या मिनिटाला गोल करत नेदरलँडची आघाडी कमी केली. राइट याने क्रिश्चियन पुलिसिच याच्या शानदार पासवर हा गोल केला. त्यानंतर नेदरलँडच्या डेन्झेल डम्फ्रीज याने 81 व्या मिनिटाला गोल करत नेदरलँडची आघाडी आणखी वाढवली. अमेरिकेला अखेरपर्यंत ही आघाडी तोडता आली नाही. नेदरलँडने हा सामना 3-1 अशा गोलफरकाने जिंकला.

अमेरिकेचा संघ 2002 नंतर कधीही क्वार्टर फायनलमध्ये पोहचलेला नाही. तर नेदरलँडने मात्र यापुर्वी 1974, 1978 आणि 2010 मध्ये स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते. तर 2018 मध्ये नेदरलँड संघ स्पर्धेसाठी पात्रही ठरला नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com