नवख्या गोलंदाजाने माजी कर्णधार धोनीला केले क्लीन बोल्ड; व्हिडीओ होतोय व्हायरल

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

2018 साली हरिशंकर रेड्डीने टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेश संघाकडून पदार्पण केले होते.

चेन्नई: (The new bowler made former skipper Dhoni clean bold The video is going viral) इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या 2021 मध्ये होणाऱ्या हंगामासाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाने 22 वर्षीय वेगवान गोलंदाज हरिशंकर रेड्डीला खरेदी केले होते. आणि याच गोलंदाजाने सरावादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि फलंदाज महेंद्र सिंग धोनीला बाद केले आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स संघाने हरीशंकर रेड्डीला 22 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. आणि त्याने थेट संघाचा कर्णधार एम एस धोनीचीच विकेट घेत आपले कौशल्य दाखवल्यामुळे "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" ही म्हण त्याला तंतोतंत लागू पडत असल्याचे दिसते.  

आयपीएलच्या 14 व्या हंगामाची तयारी सध्या जोरात सुरु झाली आहे. आणि यंदाच्या मोसमात उत्तम कामगिरी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघाचे खेळाडू सध्या चेन्नईमध्ये सराव करत आहेत. कधी नेटमध्ये, तर कधी खुल्या मैदानावर हे खेळाडू कसून तयारी करताना दिसत आहेत. याच सरावाच्या वेळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करताना दिसत आहे. व पुढे हरिशंकर रेड्डीने आपल्या वेगवान गोलंदाजीने थेट लेग स्टंप उडवत धोनीला बाद केल्याचे या व्हिडिओ पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओचीच जोरदार चर्चा रंगली आहे. (The new bowler made former skipper Dhoni clean bold The video is going viral)  

हरिशंकर रेड्डीने गोलंदाजी करताना थेट धोनीचीच विकेट घेतल्याने सोशल मीडियावर हरिशंकर रेड्डीच्या वेगवान गोलंदाजीची चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. 2018 साली हरिशंकर रेड्डीने टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेश संघाकडून पदार्पण केले होते. आंध्र प्रदेश संघासाठी त्याने आता पर्यंत 13 टी-ट्वेन्टी सामने आणि ५ स्थानिक सामने खेळलेले आहेत. या एकूण सामन्यांमध्ये त्याने 27 बळी मिळवलेले आहेत. व आयपीएल मध्ये त्याला पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्स या संघाने खरेदी केले आहे. (The new bowler made former skipper Dhoni clean bold The video is going viral)  

INDvsENG : जोस बटलरच्या अर्धशतकीय खेळीमुळे पाहुण्या इंग्लंडचा टीम इंडियावर विजय 
  
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स संघाचे सर्व खेळाडू चेन्नईत गेल्या काही काळापासून सराव करत आहेत. ज्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांचा देखील समावेश आहे. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली असलेल्या चेन्नईच्या संघाला संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या स्पर्धेत म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे येणाऱ्या काळात चेन्नई सुपर किंग्स संघाला चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे.

 

संबंधित बातम्या