IPL 2021: एबी डिव्हिलियर्सच्या नावावर नवीन विक्रम 

IPL 2021: एबी डिव्हिलियर्सच्या नावावर नवीन विक्रम 
ABD

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (ABD) आयपीएलमध्ये आणखी एक मोठा विक्रम केला आहे. आयपीएलच्या (IPL) इतिहासात 5,000 धावा काढणारा डिव्हिलियर्स सहावा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये 5,000 हून अधिक धावा करणारा तो दुसरा परदेशी फलंदाज ठरला आहे. एबी पूर्वी डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये 5,000 हून अधिक धावा केल्या आहेत. यावेळी विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज  आहे. आयपीएलमध्ये कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत 6,041 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 6,000 धावा करणारा एकमेव फलंदाज कोहली आहे. डीव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 3,288 चेंडूत 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये कमी बालमध्ये जलद गतीने 5,000 धावा पूर्ण करण्यात एबी यशस्वी झाला आहे. (New record in the name of AB de Villiers)

डेविड वॉर्नरने (David Warner)) आयपीएल कारकिर्दीमध्ये 3,555 चेंडूत 5,000 धाव पूर्ण केल्या आहेत. सुरेश रैनाने 3615 चेंडूत 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर, रोहित शर्माने (Rohit Sharma) 3,817 चेंडूत 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली, शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी देखील आयपीएलमध्ये 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्स एकमेक असा फलंदाज आहे ज्याने 150 च्या स्ट्राईक रेट 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. एबीने 5,000 धावा 161 सामन्यात पूर्ण केल्या आहेत. सामन्यांचा हिशोबाने विचार केला तर डेविड वॉर्नरने 135 सामन्यात 5,000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तसेच विराट कोहलीने 157 सामन्यात 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत.

दरम्यान, आयपीएलचा यंदाचा हंगाम 9 एप्रिल पासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 22 सामने झालेले आहेत. काल दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध झालेल्या सामन्यात एबीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आज रात्री चेन्नई (CSK) विरुद्ध हैद्राबाद (SRH) सामना होणार आहे.


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com