एफसी गोवाच्या आक्रमणात नवे अस्त्र

एफसी गोवाच्या आक्रमणात नवे अस्त्र
igor Angulo

पणजी

आगामी फुटबॉल मोसमासाठी एफसी गोवा संघाच्या आक्रमणात नवे अस्त्र सामावले आहे. त्यांनी ३६ वर्षीय स्पॅनिश फॉरवर्ड इगोर आंगुलो याला एका वर्षासाठी करारबद्ध केले.

मागील चार मोसम पोलंडमधील व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत यशस्वी छाप पाडलेला इगोर आंगुलो यापूर्वी स्पेनफ्रान्ससायप्रसग्रीसमध्येही व्यावसायिक फुटबॉल खेळला आहे. स्पेनमधील बास्के प्रांतातील या आघाडीपटूने स्पेनमधील ॲथलेटिक बिल्बाओ संघातर्फे व्यावसायिक कारकिर्दीस सुरवात केली.

२०१६ पासून पोलंडमधील गॉर्निक झाब्रझ या संघाचा आघाडीफळीतील प्रमुख खेळाडू ठरला. तेथील पहिल्या मोसमात त्याच्या शानदार कामगिरीमुळे झाब्रझ संघाने अव्वल श्रेणीसाठी (एक्स्ट्राक्लासा) पात्रता मिळविली होती. त्याने या संघातर्फे सर्व स्पर्धांत मिळून १५४ सामन्यांत ८८ गोल व २१ असिस्ट अशी कामगिरी केली आहे. एक्स्ट्राक्लासा स्पर्धेत त्याने २०१८-१९ मोसमात सर्वाधिक २४ गोल नोंदवून गोल्डन बूटचा मान पटकावला होता.

एफसी गोवाची शैलीतत्वज्ञान या बाबींनी आपणास आकर्षित केल्याचे इगोर याने करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. एफसी गोवा संघ नेहमीच आक्रमणावर भर देतो आणि त्या प्रयत्नात फुटबॉलमधील सुंदर शैली तयार होतेअसे इगोरने आपल्या नव्या संघाचे कौतुक करताना सांगितले. ‘‘एफसी गोवाची मानसिकता विजयांची आहे. उच्च बहुमानासाठी ते नेहमीच लढतात. मला येथे आल्यानंतर हेच करायचे आहे,’’ असे स्पेनमधील बिल्बाओ येथील रहिवासी असलेल्या या सेंटर-फॉरवर्ड खेळाडूने सांगितले. एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी इगोरचे संघात स्वागत करताना त्याच्या गोल नोंदविण्याच्या सातत्याचे कौतुक केले. त्याचे गोल करण्याचे सातत्य सिद्ध झाले असून त्याची शैली नैसर्गिक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

एफसी गोवाने आतापर्यंत नव्या मोसमासाठी इगोर आंगुलो याच्यासह रेडीम ट्लांगसॅनसन परेरामाकन विंकल चोथे हे नवे खेळाडू करारबद्ध केले आहेत. अनुभवी लेनी रॉड्रिग्ज व स्पॅनिश एदू बेदिया यांचा करार वाढविला आहेतर राईट-बॅक खेळाडू लिअँडर डिकुन्हा याला मुख्य संघात बढती दिली आहे.

‘‘एफसी गोवासाठी खेळण्याच्या आशेने मी उत्साहित आहे आणि उत्कंठावर्धक प्रवास शक्य तो लवकर सुरू करण्यास इच्छुक आहे.’’

- इगोर आंगुलोएफसी गोवाचा नवा खेळाडू

पोलंडमधील इगोर आंगुलोची आकडेवारी

मोसम सामने गोल असिस्ट

२०१६-१७ ३४ १७ ५

२०१७-१८ ३८ २७ २

२०१८-१९ ४५ २८ ८

२०१९-२० ३७ १६ ६

एकूण १५४ ८८ २१

संपादन - अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com