Jimmy Neesham म्हणाला, 'सूर्या तू माझा वाढदिवस खराब केलास'

Jimmy Neesham Virat Tweet: न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Jimmy Neesham
Jimmy NeeshamDainik Gomantak

Jimmy Neesham Virat Tweet: न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. वास्तविक, जिमी नीशम हा क्रिकेटमधील सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अतिशय धोकादायक फलंदाज मानला जातो. याशिवाय तो उत्तम गोलंदाजीही करतो. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये जिमी नीशम हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला फलंदाज आहे. सूर्यकुमार यादव या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, जिमी नीशम 165.84 च्या स्ट्राइक रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत 38 डावात 607 धावा केल्या आहेत.

खरंतर, जिमी नीशमची ट्विटवरील एक कमेंट खूप व्हायरल होत आहे. एका वेबसाइटने ट्विट करुन जिमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कॅप्शनमध्ये प्रशंसा करताना असे लिहिले की, जिमी नीशम हा सूर्यकुमार यादवनंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला दुसरा फलंदाज आहे. मग काय होतं... जिमी नीशमने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टॅग करत मजेशीर उत्तर दिलं. जिमी नीशमने त्याच्या प्रत्युत्तरात लिहिले की, तुम्ही एका शानदार ट्विटला का खराब केलं?

Jimmy Neesham
Kane Williamson चे न्यूझीलंड संघात पुनरागमन, या दिग्गजांनाही मिळाली संधी

जिमी नीशम आणि सूर्यकुमार यादव यांची चांगली बाँडिंग आहे

वास्तविक, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम आणि सूर्य कुमार यादव यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) एकत्र खेळले आहेत. विशेष म्हणजे, जिमी नीशम याआधी चर्चेत आला होता, जेव्हा त्याने न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेटचा केंद्रीय करार नाकारला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com