Test Ranking: द्विशतकानंतर विलियम्सनची मोठी भरारी! स्मिथच नाही, तर रुट, विराटही राहिले मागे

श्रीलंकेविरुद्ध द्विशतक ठोकल्यानंतर केन विलियम्सनला कसोटी क्रमवारीत फायदा झाला असून त्याने मोठी झेप घेतली आहे.
Kane Williamson
Kane WilliamsonDainik Gomantak

Latest ICC Test Ranking: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात नुकतीच कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने 2-0 असा विजय मिळवला. या मालिकेत केन विलियम्सनची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याला या मालिकेतील मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला.

त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 121 दुसऱ्या सामन्यात 215 धावांची द्विशतकी खेळी करत अनेक विक्रमही नावावर केले होते. आता याचा त्याला फायदा झाल्याचे दिसले आहे. त्याने कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत मोठी भरारी घेतली आहे. त्याने चार स्थांनांची झेप घेत आता दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्याचे आता 883 रेटींग पाँइंट्स झाले आहेत.

Kane Williamson
Kane Williamson: द्विशतक एक रेकॉर्ड्स अनेक! विलियम्सनचा डबल धमाका ठरला ऐतिहासिक

या यादीत सध्या अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन आहे. त्याचे 915 रेटिंग पाँइंट्स आहेत. दरम्यान, विलियम्सन दुसऱ्या क्रमांकावर आल्याने स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या आणि जो रुट चौथ्या, तर बाबर आझम पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. स्मिथचे 872, रुटचे 871 आणि बाबरचे 862 रेटिंग पाँइंट्स आहेत.

या यादीत ऋषभ पंत एकमेव खेळाडू आहे जो अव्वल 10 जणांमध्ये आहे. पंत 10 व्या क्रमांकावर असून 766 त्याचे रेटिंग पाँइंट्स आहेत. या क्रमवारी भारताचा कर्णधार रोहित शर्मा 2 स्थानांनी घसरला आहे. तो आता 12 व्या क्रमांकावर घसरला आहे. तसेच त्याच्या पाठोपाठ भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे.

Kane Williamson
NZ vs SL: विलियम्सन-निकोल्स श्रीलंकेसाठी डबल-ट्रबल! द्विशतकासह कसोटीत पहिल्यांदाच केला 'हा' कारनामा

गोलंदाजांच्या यादीत मात्र, भारताचा फिरकीपटू आर अश्विन 869 रेटिंग पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ जेम्स अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर असून 859 रेटिंग पाँइंट्स आहेत. या यादीत पहिल्या 10 जणांमध्ये अश्विन व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा हे भारतीय खेळाडू आहेत. बुमराह सातव्या आणि जडेजा नवव्या क्रमांकावर आहे.

अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या दोन्ही क्रमांकावर भारतीय खेळाडू आहेत. रविंद्र जडेजा अव्वल क्रमांकावर आहे, तर आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जडेजाचे 431 रेटिंग पाँइंट्स आहेत, तर अश्विनचे 359 रेटिंग पाँइंट्स आहेत. महत्त्वाचे म्हणजे अक्षर पटेलही पहिल्या पाच जणांमध्ये असून तो 316 रेटिंग पाँइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com