ICC ने केली 'ही' मोठी घोषणा, न्यूझीलंडला डबल झटका; टीम इंडियाला सुवर्णसंधी

ICC Men's ODI Team Rankings: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर आयसीसी मेन्स वनडे टीम रॅकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे.
New Zealand
New ZealandDainik Gomantak

ICC Men's ODI Team Rankings: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर आयसीसी मेन्स वनडे टीम रॅकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर आयसीसी मेन्स वनडे टीम रॅकिंगमध्येही न्यूझीलंडला फटका बसला आहे. तर टीम इंडियाला या मोठ्या विजयाचा फायदा झाला आहे.

क्रमवारीत मोठा बदल

रायपूरमध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर MRF टायर्स आयसीसी मेन्स वनडे टीम रॅकिंगमध्ये न्यूझीलंड (New Zealand) दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे, तर इंग्लंडने टॉप केले आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड 115 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर होता. इंग्लंड 113 रेटिंग गुणांसह दुसऱ्या, 112 रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि 111 रेटिंग गुणांसह भारत चौथ्या स्थानावर आहे. भारताकडून आठ गडी राखून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड 113 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर भारत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

New Zealand
ICC ODI Ranking: किंग कोहली पुन्हा टॉप 5 फलंदाजांमध्ये, गिल-सिराजचीही गरुडझेप

टीम इंडियाला अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे

या मालिकेत टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत केले तर आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर वन होण्याची सुवर्णसंधी असेल. टीम इंडियाने या मालिकेत क्लीन स्वीप केल्यास त्याचे 114 गुण होतील आणि न्यूझीलंडचा संघ 111 गुणांवर घसरेल. अशा परिस्थितीत, या मालिकेनंतर टीम इंडियाला वनडेमध्ये नंबर वन होण्याची संधी आहे. सध्या या मालिकेत टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

New Zealand
ICC Test Ranking: टीम इंडियाकडून अवघ्या तीन तासात ऑस्ट्रेलियाने हिरावला 'नंबर वन'चा ताज!

एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरु झाली आहे

या वर्षाच्या अखेरीस, एकदिवसीय विश्वचषक फक्त भारतात खेळवला जाणार आहे (ODI विश्वचषक 2023). टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेपासून तयारी सुरु केली आहे. या मोठ्या स्पर्धेच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्ध होणारी मालिका भारतीय खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

टीम इंडियाने 2011 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटच्या वेळी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, हा विश्वचषक देखील फक्त भारतातच खेळला गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com