ICC ODI Rankings: न्यूझीलंडला मोठा धक्का, वनडे क्रमवारीत इंग्लंडचा वरचष्मा

New Zealand: आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा बदल झाला आहे.
New Zealand
New ZealandDainik Gomantak

ICC ODI Rankings: आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. वनडे क्रमवारीत न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. किवी संघ आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर वन संघ राहिला नाही. ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडला एकदिवसीय क्रमवारीत मोठा धक्का बसला, तर किवी संघाच्या पराभवाचा फायदा इंग्लंडला झाला. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लिश संघ पहिल्या क्रमांकावर आला आहे. इंग्लंड सध्याचा विश्वविजेता आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. पाहुण्या न्यूझीलंडला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन सामने गमावल्यानंतर किवी संघाने वनडे क्रिकेटमधील नंबर वनची खुर्ची गमावली आहे. इंग्लंडचा (England) संघ आता 119 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा (New Zealand) संघ 117 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत 111 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

New Zealand
ICC ODI Batsmen Rankings: शुभमन गिलला बंपर फायदा, तर गब्बरला मोठा तोटा

दुसरीकडे, आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान (Pakistan) 107 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे, ज्यांच्या खात्यात 104 गुण आहेत. सहाव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाकडे 101 गुण आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही संघाला 100 किंवा त्याहून अधिक रेटिंग गुण नाहीत. इंग्लंडची राजवट दीर्घकाळ टिकू शकते, कारण आगामी काळात खूप कमी टी-20 सामने होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com