बोल्टपाठोपाठ 'या' दिग्गज फलंदाजालाही न्यूझीलंड बोर्डाने केले Central Contract मधून मुक्त

ट्रेंट बोल्ड आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनाही यापूर्वी न्यूझीलंडने राष्ट्रीय करारातून मुक्त केले होते
Kane Williamson and Martin Guptill
Kane Williamson and Martin GuptillDainik Gomantak

Martin Guptill released from central contract: न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज मार्टिन गप्टिलला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय करारातून मुक्त केले असल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे. करारातून मुक्त करण्याची मागणी स्वत: गप्टीलकडून करण्यात आली होती. जगभरातील विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी शोधण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. गप्टील नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषकातही न्यूझीलंड संघाचा भाग नव्हता.

न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 'न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाबरोबर झालेल्या चर्चेनंतर गप्टीलची करारातून मुक्त करण्याची विनंती मंजू करण्यात आली आहे.' अशाप्रकारे करारातून मुक्त होणारा गप्टील न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी ट्रेंट बोल्ड आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांना देखील न्यूझीलंडने करारातून मुक्त केले होते. पण असे असले तरी हे तिन्ही खेळाडू न्यूझीलंडसाठी खेळण्यासाठी उपस्थित राहू शकतात.

Kane Williamson and Martin Guptill
IND vs NZ: भारताविरुद्धच्या वनडे अन् टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा !

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी म्हटले आहे की, 'आम्ही मार्टिनची परिस्थिती समजू शकतो. तो दिर्घकाळापासून शानदार फलंदाज राहिला आहे. तो इतर संधींचा शोध घेत असताना आम्ही त्याच्या मार्गात नक्कीच उभे राहू इच्छित नाही. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये गप्टील दिग्गज खेळाडू राहिला आहे. न्यूझीलंडमधीलही तो वचनबद्ध आणि आदरणीय खेळाडू आहे. आणि त्याला स्वत: च्या मतानुसार त्याची कारकीर्द घडवण्याचा अधिकार आहे. आमच्या शुभेच्छांसह तो करारातून मुक्त झाला आहे.'

याबद्दल 36 वर्षीय गप्टील (Martin Guptill) म्हणाला, 'माझ्या देशासाठी खेळणे हा मोठा सन्मान आहे आणि मला दिलेल्या पाठिंब्यासाठी मी न्यूझीलंड क्रिकेटमधील सर्वांबद्दल कृतज्ञ राहिल. पण मी सध्याच्या परिस्थितीत माझ्या पर्यायांचा विचार करण्याची गरज समजून घेण्याइतपत वास्तववादी आहे.'

Kane Williamson and Martin Guptill
BCCI धोनीला देऊ शकते 'डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ ची मोठी जबाबदारी !

गप्टीलने त्याच्या कारकिर्दीत 198 वनडे सामने खेळले असून 41.73 च्या सरासरीने 7346 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 122 सामन्यांत 31.81 च्या सरासरीने 3531 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 47 कसोटी सामने खेळताना 2586 धावा केल्यात. त्याच्या नावावर 23 आंतरराष्ट्रीय शतकांचीही नोंद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com