हनीमून सोडून युजवेंद्र चहल धोनीच्या भेटीला...

हनीमून सोडून युजवेंद्र चहल धोनीच्या भेटीला...
yuzvendra chahal met MS Dhoni in Dubai

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल नुकताच विवाहबंधनात अडकला. २२ डिसेंबर रोजी धनश्री वर्माशी त्याने विवाह केला. लग्नानंतर दुबईत हनीमुनसाठी गेलेल्या चहलने मात्र, हनीमुन सोडून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली. धोनी हा पत्नी साक्षीसह दुबईतच असल्याने त्यांची तेथेच भेट झाली. या भेटीची समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा सुरू आहे.  

युजवेंद्र चहलने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत त्याने धोनीसोबत फोटो काढला आहे. मात्र, या फोटोत धोनीची पत्नी साक्षीही कैद झाली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये चहल आणि धोनी पती-पत्नींनी एकत्र एक फोटो शेअर केला आहे. काही वेळापूर्वीच शेअर केलेल्या या फोटोला १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा समाजमाध्यमांवर  अतिशय कमी अॅक्टीव्ह असतो. आयपीएलनंतर धोनीने भारतात येण्याऐवजी दुबईतच सुट्ट्या साजऱ्या कऱण्याचा निर्णय घेतला. आयपीएल संपल्यावर धोनीने पत्नी साक्षीचा वाढदिवसही दुबईतच साजरा केला होता. तो आपल्या कुटुंबासोबत सुट्टीवर असताना चहलही हनीमुनसाठी दुबईत दाखल झाल्याने त्यांची दुबईतच भेट झाली. 

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी  आपल्या लग्नाचे सर्व फोटो इंस्टाग्रॅमवर शेअर केले होते. आता हनीमुनसाठी दुबईत गेल्यानंतर धोनी दाम्पत्याबरोबर त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमुळे धोनी आणि चहल यांचे फॅन्स बेहद खुश झाले आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com