World Boxing Championships: निखतचा दुसऱ्यांदा 'सुवर्णपंच'! व्हिएतनामची बॉक्सर फायनलमध्ये चीतपट

निखत झरिनने जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
Nikhat Zareen
Nikhat ZareenDainik Gomantak

Nikhat Zareen clinching Gold Medal: रविवारी भारताच्या निखत झरिनने नवी दिल्लीत होत असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तिने ५० किलो वजनी गटात झालेल्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या एनगुयेन थी टॅम हिला ५-० अशा फरकाने पराभूत केले आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

निखतने पाच फेरीत 28-27, 28-27, 28-27, 29-26 आणि 28-27 अशा गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात निखतने आक्रमक सुरुवात केली होती. पण थी टॅमही तिला टक्कर देत होती. पण नंतर निखतने पूर्ण सामन्यात वर्चस्व राखले.

निखतने दुसऱ्यांचा जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी तिने गेल्यावर्षी म्हणजेच २०२२ साली झालेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. पण त्यावेळी ती ५२ किलो वजनी गटात खेळली होती.

निखत जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत दोन किंवा त्यापेक्षा अधिक सुवर्णरपदक जिंकणारी मेरी कोम नंतरची दुसरीच भारतीय आहे. मेरी कोम हिने 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018 अशी सहा वेळा सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

दरम्यान, यावर्षी निखतच्या पूर्वी नीतू घंघास आणि स्विटी बुरा यांनीही जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. नीतूने ४८ किलो वजनी गटात आणि स्विटीने ८१ किलो वजनी गटात ही सुवर्ण कामगिरी केली. त्यामुळे यावर्षीचे निखतचे जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक ठरले आहे.

महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेत अद्याप लवलिना बोर्गेहेन हिचा अंतिम सामना होणे बाकी असून तिलाही सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. जर तिनेही सुवर्णपदक जिंकले तर २००६ नंतर पहिल्यांदाच भारताचे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com