BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या आई निरुपा गांगुली यांना कोरोनाची लागण

निरुपा गांगुली (Nirupa Ganguly) यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. परंतु त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या आई निरुपा गांगुली यांना कोरोनाची लागण
(BCCI) चे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची आई निरुपा गांगुली (Nirupa Ganguly) या कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive). Dainik Gomantak

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) चे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची आई निरुपा गांगुली (Nirupa Ganguly) या कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आढळल्या आहेत. निरुपा गांगुली यांना श्वसनाचा त्रास (breathlessness) होत असल्याने त्यांना कोलकतामधील (Kolkata) एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.

(BCCI) चे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची आई निरुपा गांगुली (Nirupa Ganguly) या कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive).
सौरव गांगुली यांची पुन्हा प्रकृती बिघडली: खासगी हॉस्पीटलमध्ये केले दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, निरुपा गांगुली यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. 4 डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष देत आहेत. श्वसनाच्या त्रासा शिवाय त्यांना आरोग्याचे इतर मापदंड देखील आहेत. निरुपा गांगुली यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सौरव गांगुली यांची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. परंतु त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

(BCCI) चे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची आई निरुपा गांगुली (Nirupa Ganguly) या कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive).
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला डिस्जार्ज

या आधी सौरव गांगुली यांचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. तर सौरव गांगुली यांची देखील जानेवारी महिन्यात ह्रदयविकाराच्या आजारामुळे प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर एँजियोप्लास्टी देखील करण्यात आली. सौरव यांना 2 जानेवारीला छातीत दुखू लागले होते, तसेच त्यांचे डोके जड होणे, उल्टी आणि चक्कर येणे हा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते घराच्या जवळच जिममध्ये व्यायाम करत होते. या आजारातून बरे झाल्यानंतर गांगुली पुन्हा BCCI च्या कामामध्ये व्यस्त झाले. भारतीय संघाचा सध्या इंग्लंड दौरा सुरु आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळी ते इंग्लंडमध्ये देखील उपस्थित होते. यावेळी आगामी टी-20 विश्वचषकाच्या संदर्भात गांगुली, भारतीय संघाचे प्रक्षिशक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांची चर्चा झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com