Ethanol Blended Petrol: दुचाकी-कार चालकांसाठी गडकरींची मोठी घोषणा, तुम्हीही म्हणाल...

Nitin Gadkari: देशातील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असून इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देत आहेत.
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin GadkariDainik Gomantak

Ethanol Blended Petrol: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. देशातील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असून इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देत आहेत. आता केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, 'श्रीलंका आणि बांगलादेशने भारतातून इथेनॉल आयात करण्यास स्वारस्य दाखवले आहे.' त्यांनी इथेनॉलबद्दल दोन्ही देशांच्या (श्रीलंका आणि बांगलादेश) सरकारांशी चर्चा केली आहे.

15 दिवसांत पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा केली जाईल

जैव-इंधनावरील CII परिषदेला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, 'मी याबाबत बांगलादेशचे पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या मंत्र्यांशी चर्चा केली आहे. बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश पेट्रोलमध्ये (Petrol) इथेनॉलचा वापर करण्यासाठी भारतातून इथेनॉल आयात करण्यास खूप उत्सुक आहेत.' पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत 15 दिवसांत बैठक होणार आहे, ज्यामध्ये देशात इथेनॉल पंप सुरु करण्याबाबत चर्चा केली जाईल, असेही गडकरी म्हणाले.

Union Minister Nitin Gadkari
Nitin Gadkari: कार चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ''गडकरींनी नवीन वर्षात..."

इथेनॉलसाठी उत्तम भविष्य

इथेनॉलचे भविष्य खूप चांगले असल्याचेही गडकरी म्हणाले. देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विक्रीमुळे तेलाच्या किंमती कमी होतील. याचा सर्वात मोठा फायदा कार, बाईक अशी खाजगी वाहने चालवणाऱ्यांना होणार आहे. यासोबतच याच्या वापरामुळे प्रदूषणाची पातळीही कमी होऊ शकते. गडकरी पुढे म्हणाले की, सरकार (Government) अधिकाधिक इथेनॉल खरेदी करण्यास उत्सुक आहे. त्याचबरोबर पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याचाही विचार करत आहे.

Union Minister Nitin Gadkari
Nitin Gadkari: वाहन चालकांसाठी गडकरींची मोठी घोषणा, तुम्हीही आनंदाने माराल उड्या

शेवटी गडकरी म्हणाले की, 'हरित इंधनामुळे प्रदूषणाचा प्रश्नही सुटेल. प्रदूषणाची सातत्याने वाढणारी पातळी कमी करण्यासाठी, इलेक्ट्रिक हायवेच्या बांधकामासोबतच अधिक इलेक्ट्रिक कारवर सबसिडी दिली जात आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com