तिसवाडी तालुका ऑनलाईन बुद्धिबळात नीतिश बेलुरकर विजेता

क्रीडा प्रतिनिधी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

तिसवाडी तालुका ऑनलाईन साखळी बुद्धिबळ स्पर्धेत फिडे मास्टर नीतिश बेलुरकर याने विजेतेपद मिळविले. त्याचे व मंदार लाड यांचे समान आठ गुण झाले, मात्र नीतिश टायब्रेकरमध्ये सरस ठरल्याने विजेता ठरला.

पणजी:  तिसवाडी तालुका ऑनलाईन साखळी बुद्धिबळ स्पर्धेत फिडे मास्टर नीतिश बेलुरकर याने विजेतेपद मिळविले. त्याचे व मंदार लाड यांचे समान आठ गुण झाले, मात्र नीतिश टायब्रेकरमध्ये सरस ठरल्याने विजेता ठरला.

आयुष शिरोडकर याने साडेसात गुणांसह तिसरा क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेत एकूण ११० स्पर्धक सहभागी झाले होते. गोवा बुद्धिबळ संघटनेची ही ऑनलाईन साखळी बुद्धिबळ स्पर्धा सर्व १२ ही तालुका संघटनेतर्फे घेतली जाईल. आतापर्यंत सहा तालुका संघटनांची स्पर्धा झाली असून नीतिशने लक्षवेधक खेळ केला आहे. त्याने तीन स्पर्धांत विजेतेपद, तर दोन स्पर्धांत उपविजेतेपद मिळविले आहे. सर्व तालुका संघटनांच्या स्पर्धा झाल्यानंतर स्पर्धेतील विजेता घोषित केला जाईल.

तिसवाडी ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत ऋत्विज परब, श्रीलक्ष्मी कामत (प्रत्येकी ७ गुण), देवेश नाईक, शेन ब्रागांझा, साईराज वेर्णेकर, अनिरुद्ध पार्सेकर, रूबेन कुलासो, उत्कर्ष गणपुले (सर्व प्रत्येकी ६.५ गुण), पार्थ साळवी, आलेक्स सिक्वेरा, साईरुद्र नागवेकर, गुंजल चोपडेकर (सर्व प्रत्येक ६) यांना अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक मिळाला. अन्य वयोगटात स्वेरा ब्रागांझा, सारस पोवार, दिया सावळ, एथन वाझ, वैष्णवी परब, एड्रिक वाझ, जॉय काकोडकर, वालंका फर्नांडिस, सयुरी नाईक यांना बक्षीस मिळाले.

संबंधित बातम्या