नीतिशची राज्यस्तरीय ऑनलाईन बुद्धिबळात बाजी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

नीतिश बेलुरकर याने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या राज्यस्तरीय ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. एकूण बारा स्पर्धांच्या मालिकेतील सहा स्पर्धा जिंकून त्याने अव्वल क्रमांक पटकाविला.

पणजी : नीतिश बेलुरकर याने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या राज्यस्तरीय ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. एकूण बारा स्पर्धांच्या मालिकेतील सहा स्पर्धा जिंकून त्याने अव्वल क्रमांक पटकाविला. कोरोना विषाणू महामारीमुळे स्पर्धेचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आयोजन करण्यात आले.

नीतिशने धारबांदोडा तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या मालिकेतील शेवटच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवून राज्यस्तरीय विजेतेपद निश्चित केले. गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या ई गटात अव्वल ठरलेल्या नीतिशने महिनाभरात आणखी एक यश प्राप्त केले.
धारबांदोडा तालुका संघटनेच्या स्पर्धेत नीतिशने नऊ फेऱ्यांतून साडेआठ गुणांची कमाई केली. साडेसात गुणांसह ऋत्विज परब उपविजेता ठरला. सात गुणांसह आयुष शिरोडकर तिसऱ्या स्थानी राहिला. या स्पर्धेपूर्वी नीतिश व ऋत्विज यांनी प्रत्येकी पाच स्पर्धा जिंकल्या होत्या, त्यामुळे विजेतेपदासाठी चुरस होता.

राज्यस्तरीय मालिकेतील स्वेरा ब्रागांझा, वसंत नाईक, सारस पोवार, आदित्य दुबळे, दिया सावळ, म्युरिएल फर्नांडिस, एथन वाझ, आदित्य तांबा, वैष्णव परब, साईजा देसाई, एड्रिक वाझ, अनिकेत एक्का, आर्या दुबळे, वालंका फर्नांडिस, जॉय काकोडकर, लव्ह काकोडकर, सयुरी नाईक, नेत्रा सावईकर यांनीही बक्षिसे प्राप्त केली. सांघिक गटात तिसवाडी तालुक्याने सहा सुवर्ण, पाच रौप्य, दोन ब्राँझ, सासष्टी तालुक्याने सहा सुवर्ण, तीन रौप्य व चार ब्राँझ, तर बार्देश तालुक्याने चार रौप्य व तीन ब्राँझपदके मिळविले.                  नीतिशला सर्व 

सर्व स्पर्धेत पोडियम 
नीतिशने बारा स्पर्धांच्या मालिकेत सहा सुवर्ण, पाच रौप्य व एका ब्राँझपदकाची कमाई करताना प्रत्येक स्पर्धेत पोडियम मिळविले. ऋत्विजने पाच सुवर्ण व तीन रौप्यपदके मिळवून दुसरा क्रमांक प्राप्त केला. व्हिवान बाळ्ळीकरने तिसरा क्रमांक मिळविताना एक सुवर्ण व एक ब्राँझपदक मिळविले. मंदार लाड (३ रौप्य, २ ब्राँझ), शेखर सिरसाट (१ रौप्य), देवेश नाईक (३ ब्राँझ), आयुष शिरोडकर (२ ब्राँझ), साईराज वेर्णेकर, शेन ब्रागांझा, पार्थ साळवी (प्रत्येकी १ ब्राँझ) यांनी अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिलविला.

संबंधित बातम्या