ऑनलाईन बुद्धिबळात नीतिशचे वर्चस्व कायम

ऑनलाईन बुद्धिबळात नीतिशचे वर्चस्व कायम
8th online blitz

पणजी, 

 फिडे मास्टर नीतिश बेलुरकर याने ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळातील वर्चस्व कायम राखताना आणखी एक स्पर्धा जिंकली. क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबच्या ऑनलाईन मालिकेतील आठव्या स्पर्धेत त्याने विजेतेपद प्राप्त केले.

नीतिशने प्रथम स्थान मिळविताना सर्वाघिक आठ गुण नोंदविले. मंदार लाड उपविजेता ठरला. त्याने साडेसात गुणांची कमाई केली. साडेसहा गुणांसह व्हिवान बाळ्ळीकर याने तिसरा क्रमांक मिळविला. पार्थ साळवी याचेही साडेसहा गुण झाले. त्याला चौथा क्रमांक मिळाला. रिधीकेश वेर्णेकर याने सहा गुणांसह पाचवे स्थान मिळविले. जॉय काकोडकर, अन्वेश बांदेकर, रुबेन कुलासो, शेन ब्रागांझा, साईराज वेर्णेकर यांनी अनुक्रमे सहा ते दहावा क्रमांक मिळविला. त्यांचे प्रत्येकी साडेपाच गुण झाले.

नीतिशने लॉकडाऊन कालावधीत खेळलेल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेद्वारे मिळालेली सर्व बक्षीस रक्कम मुख्यमंत्र्यांच्या कोविड-१९ साह्य निधीस दान केली आहे.

दरम्यान, क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबची लॉकडाऊनमधील ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ मालिकेतील शेवटची स्पर्धा शुक्रवारी (ता. १) होणार आहे. ही स्पर्धा राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटूंसाठी खुली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com