गोव्याच्या बुद्धिबळपटूंत नीतिशची अव्वल कामगिरी

dainik gomantak
मंगळवार, 12 मे 2020

नीतिशसह गोव्याच्या चौघा बुद्धिबळपटूंनी पहिल्या २५ खेळाडूंत स्थान मिळविले. नीतिशने सातवा, ऋत्विज परबने दहावा, इंटरनॅशनल मास्टर अमेय अवदीने १५वा, तर पार्थ साळवी याने २०वा क्रमांक प्राप्त केला.

पणजी, 

 बाणावली चेस क्लबने फातोर्डा पॅरेन्ट्स चेस क्लबच्या सहकार्याने घेतलेल्या अखिल भारतीय ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत गोमंतकीय खेळाडूंत फिडे मास्टर नीतिश बेलुरकर याने अव्वल कामगिरी नोंदविली.

स्पर्धेत पश्चिम बंगालच्या कास्तुव कुंडू याने विजेतेपद मिळविले. त्याने ९ फेऱ्यांत साडेसात गुणांची नोंद केली. तमिळनाडूच्या दिनेश राजन याने उपविजेतेपद, तर एम. प्रणेश याने तिसरा क्रमांक मिळविला.

नीतिशसह गोव्याच्या चौघा बुद्धिबळपटूंनी पहिल्या २५ खेळाडूंत स्थान मिळविले. नीतिशने सातवा, ऋत्विज परबने दहावा, इंटरनॅशनल मास्टर अमेय अवदीने १५वा, तर पार्थ साळवी याने २०वा क्रमांक प्राप्त केला. याशिवाय अनिरुद्ध पार्सेकर, एथन वाझ, साईरुद्र नागवेकर, व्हिवान बाळ्ळीकर, विनायक साळुंके, सागर शेट्टी, साईनी देसाई व वेदांत पै या गोव्याच्या खेळाडूंसाठीची बक्षिसे जिंकली.

स्पर्धेत एकूण ११० खेळाडूंनी भाग घेतला होता. प्रमुख खेळाडूंत ग्रँडमास्टर कार्तिक व्यंकटरमण याचा समावेश होता.

संबंधित बातम्या